SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
माजी दुग्धविकास मंत्र्यांचा दावा गंभीर, 'गोकुळ' वाचवण्यासाठी समविचारी आघाडीला साथ द्या: आमदार सतेज पाटील‘वंचित घटकांचे सिनेमातील स्थान’वर शिवाजी विद्यापीठात दोनदिवसीय कार्यशाळा ६ व ७ ऑक्टोबरला आयोजन; कार्यशाळा सर्वांसाठी खुलीस्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त उमळवाड येथे आरोग्य शिबिर; ४५० नागरिकांची आरोग्य व नेत्र तपासणी‘महा-उपलब्धी’ ॲप कार्यशाळेला निवृत्तीवेतनधारकांनी उपस्थित राहावेप्रा. जगदीश सरदेसाई यांना मानसशास्त्र विषयातून पीएच. डी. इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या कोल्हापूर चॅप्टरतर्फे प्रथमच ‘आयपीपीएल’ स्पर्धेचे आयोजन; ३ ऑक्टोबरपासून रोटरी समाज केंद्रात विशेष प्रशिक्षणचेहऱ्यावरचे हसू अनमोल: जागतिक स्माइल दिन विशेषआवडेल तेथे कोठेही प्रवास पास’ आता ऑनलाइन एसटीचा प्रवास अधिक सुलभकिशोर घाटगे यांना ‘इंटरनॅशनल शांती दूत समाजरत्न पुरस्कार २०२६’ जाहीर; ६ ऑक्टोबर रोजी दिल्लीत वितरण महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त विद्यापीठात अभिवादन

जाहिरात

 

31 मार्च पर्यंत सुट्टीदिवशीही घरफाळा कार्यालय व नागरी सुविधा केंद्रे सुरू राहणार

schedule23 Mar 24 person by visibility 631 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महानगरपालिका घरफाळा विभागाने 31 मार्च 2024 अखेर 30 टक्के सवलत योजनेस मुदतवाढ जाहिर केली आहे. या सवलत योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरीकांना होण्यासाठी दि.31 मार्च 2024 अखेर घरफाळा कार्यालय व सर्व नागरी सुविधा केंद्रे सुरु ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवार दि.23 ते 31 मार्च 2024 पर्यंत घरफाळा विभागाची सर्व कार्यालये व नागरी सुविधा केंद्रे शनिवार व रविवार या सुटटीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत. 

यामध्ये दि.23 ते 30 मार्च पर्यंत सर्व नागरी सुविधा केंद्रे सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत व दि.31 मार्च 2024 रोजी सकाळी 9 ते रात्रौ 11 वाजेपर्यंत सर्व नागरी सुविधा केंद्रे सुरु राहणार आहे. तरी शहरातील थकबाकीदार व चालू मागणी असणा-या मिळकतधारकांनी आपला घरफाळा, पाणीपट्टी, परवाना फी भरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

🔴 दि.1 एप्रिल 2023 ते 22 मार्च 2024 अखेर रू 63 कोटी 62 लाख 66 हजार 842 रुपये घरफाळा जमा
50 टक्के सवलत योजनेमधून 7413 इतक्या मिळकत धारकांनी सवलत घेतली आहे. या सवलतीमधून 10 कोटी 66 लाख 86 हजार 382 रुपये रक्कम जमा झाली आहे. तर दि.16 फेब्रुवारी ते दि.22 मार्च 2024 अखेर 30 टक्के सवलत योजनेमधून 6023 इतक्या मिळकत धारकांनी सवलत घेतली आहे. या सवलतीमधून 5 कोटी 20 लाख 39हजार 467 रक्कम जमा झाली आहे. दि.1 एप्रिल 2023 ते 22 मार्च 2024 अखेर रू 63 कोटी 62 लाख 66 हजार 842 रुपये इतका घरफाळा जमा झाला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes