SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अतिरिक्त प्लाझ्माचा प्रभावी वापर करून जीवनावश्यक औषधनिर्मितीचा प्रस्ताव तयार करा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफदुधगंगा वगळता 9 नद्यांवरील उपसा बंदी 3 दिवसांसाठी शिथिलपंचगंगा नदीची पाणीपातळी घटल्याने आयुक्त डॉ राजेंद्र भारूड यांची पंपिंग स्टेशनला भेट पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजनाकोल्हापूर : महाद्वार रोड व जोतिबा रोड परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाईएमसीईडीमार्फत 'उद्योजकता विकास प्रशिक्षण'चे आयोजनडीकेटीईच्या ३१ विद्यार्थ्यांची मॅक्सीमस इन्फोवेअर कंपनीत निवडकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्या दरम्यान ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंधकोल्हापुरात एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमधील चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरीअहिल्यादेवींची संघर्षगाथाही समाजासमोर यावी: डॉ. ज्योती जाधवद्वारकानाथ कापूर विद्यालय गंजीमाळ येथे नूतन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

जाहिरात

 

इंधन साठा मुबलक; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचे देशभरात 'धाडसत्र'

schedule04 Apr 26 person by visibility 433 categoryदेश

 दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली परिस्थिती पाहता, केंद्र सरकारने देशातील इंधन आणि ऊर्जा सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. विविध मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर, देशात एलपीजी (LPG), पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची ग्वाही देण्यात आली असून नागरिकांना कोणताही तुटवडा भासू नये यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
 
एलपीजी वितरण अधिक सुलभ करण्यासाठी सरकारने ५ किलोचे एफटीएल (Free Trade LPG) सिलेंडर सर्व वितरण केंद्रांवर उपलब्ध करून दिले आहेत. विशेष म्हणजे, या सिलेंडरसाठी कोणत्याही निवासी पुराव्याची (Address Proof) गरज नसून केवळ ओळखपत्र दाखवून ते मिळवता येईल.
 
 काल एकाच दिवसात देशभरात ७१ हजार एफटीएल सिलेंडरची विक्री झाली आहे. तसेच, गॅस आरक्षणासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त डिजिटल माध्यमांचा वापर करावा, असे आवाहनही मंत्रालयाने केले आहे.
 
देशातील शेती क्षेत्राला खतांचा तुटवडा भासू नये यासाठी सरकारने खत निर्मिती करणाऱ्या कारखान्यांना होणारा वायू पुरवठा ९० टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. यामुळे खतांचे उत्पादन विनाखंड सुरू राहून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
 
इंधनाची साठेबाजी आणि काळा बाजार करणाऱ्यांविरोधात सरकारने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सर्व राज्यांमध्ये प्रशासनाकडून तपासणी मोहीम राबवली जात असून, काल एका दिवसात देशभरात ३,७०० ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत.
 
नैसर्गिक वायूच्या वापराला गती देण्यासाठी सरकार पीएनजी (पाईप्ड नॅचरल गॅस) जोडणीवर भर देत आहे. मार्च महिन्यापासून आतापर्यंत देशभरात सुमारे साडेतीन लाख नवीन पीएनजी जोडण्यांना वायू पुरवठा सुरू करण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes