गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील (आबाजी) यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त रविवारी भव्य सर्वपक्षीय नागरी सत्कार; 'अमृतविश्व' गौरव अंकाचा प्रकाशन सोहळा
schedule11 Apr 25 person by visibility 434 categoryसामाजिक

कोल्हापूर : राजकीय, सामाजिक, शिक्षण, कृषी आणि विशेष करून सहकार क्षेत्रामध्ये गेली ४ दशके कार्यरत असणारे गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील याचा रविवार अमृतमहोत्सवी वाढदिवस होत आहे. या निमिताने त्यांचा 'भव्य सर्वपक्षीय नागरी सत्कार' माजी केंद्रीय गृह, उर्जामंत्री व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच आबाजर्जीच्या प्रदीर्घ कार्याविषयी माहिती देणाऱ्या 'अमृतविश्व' या गौरव अंकाचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक १३ एप्रिल रोजी करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथील केंद्र शाळेच्या मैदानावर सायंकाळी ५.०० वाजता होणार आहे. अशी माहिती काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते, आमदार सतेज पाटील यांनी दिली. विश्वास नारायण पाटील (आबाजी) अमृतमहोत्सव गौरव समितीतर्फे अजिंक्यतारा येथे आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते.
गोकुळ दूध संघ, कुंभी कासारी साखर कारखाना कुडित्रे, रयत सेवा कृषी उद्योग सहकारी संघ, कोल्हापूर या सहकारी संस्थांच्या माध्यमातून करवीर तालुक्यातील ग्रामीण भागात धवलक्रांतीची विकास गंगा गावोगावी पोहोचविण्याचे काम गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील (आबाजी) यांनी केले आहे.
शिरोली दुमालाचे डे. सरपंच ते गोकुळ दूध संघाचे चेअरमन असा प्रवास असणारे सहकारातील ज्येष्ठ नेते विश्वास नारायण पाटील (आबाजी) ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त मान्यवर व्यक्तींचे मार्गदर्शन कार्यक्रम, दूध उत्पादकांना प्रोत्साहनसाठी जास्तीत जास्त दूध देणारी गाय व म्हैस या संबंधीची 'आबाजीश्री' स्पर्धा तसेच युवकांसाठी क्रीडा स्पर्धा, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर असे विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला आहे.
या वाढदिवसाच्यानिमिताने त्यांचा 'भव्य सर्वपक्षीय नागरी सत्कार' व आबाजर्जीच्या प्रदीर्घ कार्याविषयी माहिती देणाऱ्या 'अमृतविश्व' या गौरव अंकाचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक १३ एप्रिल इ.रोजी करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथील केंद्र शाळेच्या मैदानावर सायंकाळी ठीक ०५.०० वाजता होणार आहे. या कार्यक्रमास माजी केंद्रीय गृह, उर्जामंत्री व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते आबाजींचा गौरव करण्यात येईल. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे भूषवणार आहेत. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व सर्व संचालक मंडळ याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय मान्यवर, विविध सहकारी संस्थेचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते, दूध उत्पादक, महिला भगिनी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. तरी या संयुक्त कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन गौरव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. पत्रकार बैठकीस गौरव समितीचे सदस्य उपस्थित होते.