महावीर अध्यासन इमारतीचे शुक्रवारी भूमीपूजन
schedule15 Apr 25 person by visibility 259 categoryसामाजिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाच्या इमारतीचे भूमीपूजन महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी (दि. १८) सकाळी १०.३० वाजता करण्यात येणार आहे.
सदर इमारत जैनधर्मियांसह अहिंसाप्रेमी देणगीदारांच्या आर्थिक सहकार्यातून साकार होत आहे. शिवाजी विद्यापीठाच्या पूर्वेकडील परिसरात कै. डॉ. ग.गो. जाधव अध्यासन इमारतीच्या शेजारील जागेत ही इमारत बांधण्यात येणार आहे.
कार्यक्रमास देणगीदारांसह शुभेच्छुक व्यक्ती, संस्था आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यासन समन्वयक डॉ. विजय ककडे यांनी केले आहे.