कोरे अभियांत्रिकीत ‘मल्टी-बिझनेस मॉडेल इनोव्हेशन’वर आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन
schedule07 Sep 26 person by visibility 166 categoryशैक्षणिक
वारणानगर : तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, वारणानगर येथे ‘वारणा ग्लोबल लीडर्स कनेक्ट’ उपक्रमांतर्गत कोपनहेगन बिझनेस स्कूल, डेन्मार्कचे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ प्रो. पीटर लिंडग्रेन यांचे ‘मल्टी-बिझनेस मॉडेल इनोव्हेशन अँड ग्लोबल अपॉर्च्युनिटीज’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले.
बदलत्या व्यावसायिक आणि तंत्रज्ञानाच्या युगात व्यवसाय मॉडेलमधील नवकल्पना, तंत्रज्ञान, उद्योजकता, सहकार्य आणि जागतिक संधींचे महत्त्व यावेळी प्रो. लिंडग्रेन यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
पारंपरिक व्यवसाय पद्धतींच्या पलीकडे विचार करून नव्या संधींचा शोध घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या सत्रात विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या उपक्रमासाठी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी एन. एच. पाटील, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के तसेच श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कारजिन्नी यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे आयोजन एमसीए व एमबीए विभागाच्या वतीने करण्यात आले. एमसीए विभागप्रमुख डॉ. शिवलीला अरळीमट्टी आणि एमबीए विभागप्रमुख पूनम कडापूरे यांनी नियोजन केले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून सायबर सिक्युरिटी विभागप्रमुख प्रा. राजेश गाडे यांनी काम पाहिले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. आय. पाटील, अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. सुभाष कोळी यांनी आभार व्यक्त केले.