आयजीएमला आवश्यक मनुष्यबळ आणि सुविधा देणार : सार्वजानिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर
schedule06 Jan 25 person by visibility 198 categoryआरोग्य
▪️ इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयास भेट देवून सुविधांबाबत केली पाहणी
▪️ अत्याधुनिक डायलेसिस व शस्त्रक्रिया कक्षाचे लोकार्पण
कोल्हापूर : इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात रुग्णांची संख्या पाहता मोठ्या प्रमाणत भौतिक सुविधा आणि मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यासाठी अपेक्षित मनुष्यबळ व सुविधा लवकरच देणार असल्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक अरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. त्यांनी इचलकरंजी येथे रुग्णालयास भेट देवून पाहणी केली व उपस्थित अधिकारी वर्गाचा आढावा घेतला.
यावेळी आमदार राहुल आवाडे, इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, आरोग्य अधीक्षक डॉ. भाग्यरेखा पाटील उपस्थित होते.
रुग्णालयातील आवश्यकतेनुसार आमदार राहुल आवाडे यांनी 200 चे 300 बेडमध्ये रुग्णालय रुपांतरीत करणे, एम.आर.आय., आधुनिक शस्त्रक्रिया विभाग यासह विविध सुविधा सुरु करण्याची मागणी केली. यावर मंत्री आबिटकर यांनी मी आलोय आणि पाहणी केली आहे, असे सांगून खऱ्या अर्थाने रुग्णसंख्या पाहून मागणी केलेल्या सुविधांची गरज असल्याचे सांगितले. मनुष्यबळाची नेमणूक करण्यासाठी पदनिर्मिर्ती करण्याची प्रक्रिया राबवावी लागणार आहे. तोपर्यंत कंत्राटी स्वरुपात आवश्यक मनुष्यबळ देवू, असे सांगितले. येत्या काळात आयजीएम मध्ये निश्चितच चांगले बदल करणार असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, येथील रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासाठी सुविधा नाही. प्रत्येकाला कोल्हापूर येथे जावे लागते. इचलकरंजी येथेचे येत्या आठ दिवसात दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्यासाठीची सुविधा सुरु करु, असे ते म्हणाले. या ठिकाणी नव्याने करण्यात येणारे प्रत्येक काम गुणवत्तापूर्वक होईल व ते खऱ्या अर्थाने रुग्णांसाठी आवश्यक असलेलेच असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, इचलकरंजी हे 200 खाटांवरुन 300 खाटा श्रेणीवर्धन करणे, एम.आर.आय. स्कॅन सेवा सुरु करणे, रुग्णालयामध्ये अत्याधुनिक रक्तकेंद्र व रक्त विघटन केंद्र (Blood Bank) सुरु करणे, रुग्णालयामध्ये डायलेसिस सेवा सुरु करणे, रुग्णालय आवारात पोलीस चौकी, रुग्णालयासमोरील जागेतील जुनी निवासस्थाने पाडून नविन निवासस्थाने बांधणे व रुग्णालयामध्ये एसटीपी व ईटीपी प्लांटची उभारणी करणे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.