SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पशुधनाला केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस"भीमा कृषी प्रदर्शनाच्या शनिवारच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांसह नागरिकांची ,शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची तुफान गर्दीगारगोटीत 'जिल्हा ग्रंथोत्सव २०२५' चा दिमाखात शुभारंभ; ग्रंथदिंडीने वेधले लक्षकृषी प्रदर्शन-कराओके गायन स्पर्धा : आदिती भराडे, वसिम मुजावर यांनी पटकावला प्रथम क्रमांकअतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांची घोडावत विद्यापीठाला सदिच्छा भेटभिमा कृषी प्रदर्शनात भागीरथी महिला संस्थेच्यावतीने मोफत झुणका-भाकरी वाटपमहाविकास आघाडीच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांचा सोमवारी सत्कारदक्षिण-पश्चिम विभागीय युवा महोत्सवात शिवाजी विद्यापीठ संघाचे घवघवीत यशभाजपच्या जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांचा उद्या रविवारी सत्कारशाश्वत विकासासाठी संशोधन ही रसायनशास्त्राची सामाजिक, नैतिक जबाबदारी: डॉ. इंद्रजीत घोष; शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र परिषद

जाहिरात

 

डॉ. पद्मा रेखा शिशिर जिरगे यांना दुहेरी आंतरराष्ट्रीय सन्मान

schedule31 Dec 25 person by visibility 591 categoryआरोग्य


कोल्हापूर : येथील  डॉ. पद्मा रेखा शिशिर जिरगे यांची फर्टिलिटी अँड४ रिप्रोडक्शन या नियतकालिकाच्या मुख्य संपादक (Editor-in-Chief) म्हणून नियुक्ती झाल्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा सन्मान मिळाला आहे. हे नियतकालिक Asia Pacific Initiative on Reproduction चे अधिकृत जर्नल असून ग्लोबल साउथमधील सर्वाधिक प्रतिष्ठित नियतकालिकांपैकी एक आहे. 

फर्टिलिटी अँड रिप्रोडक्शन या नियतकालिकाला जागतिक स्तरावर मोठा वाचकवर्ग असून पुनरुत्पादन वैद्यकशास्त्रातील दर्जेदार संशोधन प्रकाशित केले जाते. मध्य पूर्व, दक्षिण व आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान आणि चीन अशा विस्तृत आशिया-पॅसिफिक प्रदेशातील संशोधन या जर्नलमध्ये समाविष्ट असते. 

डॉ. जिरगे १ जानेवारी २०२६ पासून अधिकृतपणे ही जबाबदारी स्वीकारणार आहेत. यापूर्वी त्यांनी Indian Society of Assisted Reproduction च्या Journal of Human Reproductive Sciences या नियतकालिकाच्या मुख्य संपादक म्हणून कार्य केले असून त्यानंतर फर्टिलिटी अँड रिप्रोडक्शनच्या उपसंपादक (Deputy Editor) म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes