SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावायश मिळवण्यासाठी कम्फर्ट झोन सोडा : डॉ. उदय साळुंखे; डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये ‘टेक्नोलॉजिया’ उत्साहात कर्मवीर भाऊराव पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त विद्यापीठात अभिवादनप्रा. जगन कराडे यांचा रविवारी सेवानिवृत्तीनिमित्त सत्कारकेंद्रीय कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी कोल्हापुरात लवकरच केंद्रीय विद्यालय सुरू होणार, खासदार धनंजय महाडिक यांची माहितीजप्त केलेल्या स्थावर संपत्तीचा जाहीर लिलावशक्तीपीठ महामार्ग विरोधी लढा : बांधा ते वर्धा मे अखेरीस संघर्ष यात्रा काढणार : आमदार सतेज पाटीलकोल्हापूर महानगरपालिकेतर्फे एअर रायफल ट्रेनिंगचे 10 मे पासून प्रशिक्षण सुरुडी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात बौद्धिक संपत्ती अधिकार कक्षाची स्थापना; मायक्रेव्ह कन्सल्टंसी समवेत सामंजस्य करारसकारात्मक सुरुवात, सातत्य, संयम ठेवा स्वप्न साध्य होईल : ईशा झंवर; केआयटी प्रचंड उत्साहामध्ये ई-समीट संपन्न

जाहिरात

 

केआयटीच्या विश्व तांबेचे टेबल टेनिस स्पर्धेत यश राष्ट्रीय स्तरावरील पॅरा स्पर्धेत एका सुवर्णसह ५ पदकांची कमाई

schedule14 Apr 25 person by visibility 499 categoryक्रीडा

कोल्हापूर : येथील केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) अभियांत्रिकी महाविद्यालयाचा तृतीय वर्ष मेकॅनिकल विभागातील विद्यार्थी विश्व तांबे यांनी राष्ट्रीय स्तरावरील  पॅरा (दिव्यांग) टेबल टेनिसच्या  क्लास १० गटात दैदीप्यमान यश संपादन केले आहे.

वडोदरा गुजरात येथे नुकत्याच संपन्न झालेल्या अल्टिमेट टेबल टेनिस च्या २ ऱ्या पॅरा नॅशनल रँकिंग चॅम्पियनशिप २४-२५ स्पर्धेमध्ये पुरुष एकेरी मध्ये कांस्यपदक,मिक्स डबल मध्ये सुवर्णपदक, पुरुष एकेरी मध्ये रजत पदक, पुरुष दुहेरी मध्ये कांस्यपदक प्राप्त केले. तसेच २४-२७ मार्च २५ रोजी दिल्ली येथे संपन्न झालेल्या खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये पुरुष एकेरी मध्ये सुवर्णपदक प्राप्त केले.

संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली, उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव दीपक चौगुले, संचालक डॉ.मोहन वनरोट्टी, मेकनिकल विभाग प्रमुख डॉ.उदय भापकर यांचे प्रोत्साहन लाभले तर भविष्यात विश्वने आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑलम्पिक मध्ये सुद्धा अशीच दर्जेदार कामगिरी करावी अशा शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा.विजय रोकडे यांचे मोलाचे मार्गदर्शन त्याला मिळाले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes