के.एम.टी वाहतूक निरिक्षक आर.एस. धुपकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार
schedule10 Dec 24 person by visibility 302 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडील (के.एम.टी.) वाहतूक निरिक्षक रघुनाथ श्रीधर धुपकर हे 30 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला .
श्रीधर धुपकर ऑगस्ट 1994 मध्ये के.एम.टी.मध्ये सहा.वाहतूक निरिक्षक म्हणून सेवेस सुरुवात केली. सुरुवातीस मार्गावरील बसेसच्या तपासणीचे कामकांज केले. त्यानंतर छ.शिवाजी महाराज चौक येथे स्टॅण्ड इनचार्ज म्हणून कामकांज केलेनंतर मुख्य कार्यालय येथे टाईम टेबल, चालक-वाहक अलोकेशन, टाईमकिपर या विभागावर नियंत्रण ठेवणेचे कामकांज केले. सध्या त्यांचेकडे वाहतूक निरिक्षक या वाहतूक विभागाकडील वरिष्ठ पदाचा पदभार सोपविणेत आला होता.
वाहतूक निरिक्षक म्हणून कामकांज करतांना धुपकर यांनी निवडणूक कामाकांजासाठी बसेस व कर्मचारी उपलब्ध करुन देणे, कोरोना कालावाधीमध्ये कर्मचाऱ्यांचे ड्युटीचे नियोजन करणे इ. महत्वपूर्ण कामकांज पार पाडले.
धुपकर यांचे सेवानिवृत्ती निमित्त परिवहन उपक्रमाच्या मुख्य कार्यालय येथे सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले. कोल्हापूर महानगरपालिकेकडील सहाय्यक आयुक्त तथा अति.परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक यांचे हस्ते धुपकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार करणेत आला. यावेळी धुपकर यांनी बजावलेल्या सेवेबद्दल उपस्थितांनी गौरवोद्गार काढले.
या कार्यक्रमास माजी अति.परिवहन व्यवस्थापक व महानगरपालिका कर्मचारी संघाचे मुख्य संघटक संजय भोसले, वाहतूक निरिक्षक सुनिल जाधव, प्रकल्प अधिकारी पी.एन. गुरव, इश्यु-कॅश अधिक्षक एन.बी. पोवार, खरेदी अधिकारी संजय जाधव, लेखापाल राजेंद्र सुर्यवंशी, कामगार अधिकारी प्रदिप म्हेतर, सर्व सहा.वाहतूक निरिक्षक, वाहतूक नियंत्रक तसेच वाहतूक विभागाकडील व कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.