SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डॉ. डी. वाय. पाटील बी. टेक. (ऍग्री) चा विद्यार्थी कृषी शास्त्रज्ञकेआयटी चा शाहू माने राष्ट्रीय विजेता ; राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदकराज्यात 27-28 डिसेंबरदरम्यान गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज'दिलखुलास', कार्यक्रमात दंत शल्यचिकित्सक डॉ. अर्चना पवार यांची मुलाखतलाडकी बहीण योजना बंद, 'या' राज्य सरकारने थेट जाहिरातच काढलीमाजी क्रिकेटपटू विनोद कांबळीसाठी धावून आले संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनकोल्हापूर महानगरपालिका : टिप्पर चालकांचे फाळणी पुस्तक गहाळ हा तर स्कॅम 2024; 'आप'चा आरोपकूर येथे कालव्यात ट्रॅक्टर पडून चालक ठारग्राहकांनी आपल्या हक्काबाबत अधिक सजग व्हावे : प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना नष्टे; राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त भवानी मंडपात ग्राहक जनजागृतीपर स्टॉलचे उद्घाटनकोल्हापुरात महीलेस नजरबाधा झाल्याचे भासवुन फसवणूक : दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना घेतले ताब्यात, मुद्देमाल जप्त

जाहिरात

 

कोल्हापूर : दरोडा घालुन रोख रक्कमेसह ३,७३,३७७ रुपयाचा माल लुटणाऱ्या ५ आरोपी २८ तासात जेरबंद

schedule07 Dec 24 person by visibility 393 categoryगुन्हे

कोल्हापूर : दरोडा घालुन रोख रक्कमेसह ३,७३,३७७ रुपयाचा माल लुटणा-या ५ आरोपींना २८ तासात जेरबंद केले. स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखाने ही कामगीरी केली. याप्रकरणी  १) सनी बाबासाहेब शिंदे वय-२९ भारतनगर साळोखे पार्क, कोल्हापूर, २) किरण स्वामी बैदु वय ३१ रा. साळोखे पार्क राजेंद्रनगर कोल्हापूर ३) अभिजित अनिल आवळे रा. जवाहरनगर  कंदलगांव नाका, कोल्हापूर, ४) विजय सुरेश कदम वय २० रा जवाहरनगर झोपडपटटी कंदलगांव नाका, कोल्हापूर, ५) रोहित सुरेश कदम २१ रा.जवाहरनगर झोपडपटटी कंदलगांव नाका, कोल्हापूर यांना अटक करण्यात आली.

याबाबत माहीती अशी की,  दिनांक ०५ डिसेंबर रोजी आकाश जगन्नाथ शिंदे, वय २६ रा.मु.पो. माले ता. हातकणंगले जिल्हा-कोल्हापूर हे बचत गटाची जमा केलेली ३,६१,३७७/- रोख रक्कमेची बॅग मोटर सायकल वरुन घेवुन भारत फायनान्स कंपनी लिशा हॉटेल जवळ कोल्हापूर येथे घेवून जात असताना गुरुकुल रेसिडन्सी येथे चार इसमांनी मोपेड वरुन त्यांना रल्यामध्ये अडवून "राजेंद्रनगर येथे येवुन दादागिरी करतोस काय" असे म्हणून त्यास व्यथाबुक्यांनी मारहाण करुन त्यांचेकडील पैशाची बॅग व त्यामध्ये असलेली रोख रक्कम रुपये ३,६१,३७७/-, सॅमसंग कंपनीचा टेंब व बायोमॅट्रीक मशिन जबरदस्तीने हिसकावून घेवून मोपेड बरुन पळून गेले बाबत दिले फिर्यादी प्रमाणे राजारामुपरी पोलीस ठाणेस  गुन्हा दाखल झाला होता.

पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर व त्यांचे पथकाने सदरच्या गुन्हयाचा छडा लावण्यासाठी तांत्रिक व गोपनीय माहिती मिळविण्यास सुरुवात केली त्या दरम्यान पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय माहीती प्राप्त झात्ती की, ३ लाख रुपये महिला नामे संगिता शिंदे यांचेकडुन नेत असताना तिचा मुलगा सनी शिंदे यानेच कट रचला आहे. मिळाले माहिती वरुन संशयीत  सनी शिंदे याला ताब्यात घेवुन तपास केला असता, फिर्यादी यांचेकडे असलेल्या रकमे बाबत त्याला माहिती असल्याने त्याने ती माहिती त्याचे साथीदार किरण वैदु, अभिजित आवळे, विजय कदम, रोहित कदम याना देवुन गुन्हा करण्याचा कट रचून सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली.

 त्यावरुन वर नमुद पाच आरोपीना ताब्यात घेतले त्यांचे नाव पत्ते विचारता त्यानी आपली नावे १) सनी बाबासाहेब शिंदे वय-२९ भारतनगर साळोखे पार्क, कोल्हापूर, २) किरण स्वामी बैदु वय ३१ रा. साळोखे पार्क  राजेंद्रनगर कोल्हापूर ३) अभिजित अनिल आवळे रा. जवाहरनगर  कंदलगांव नाका, कोल्हापूर, ४) विजय सुरेश कदम वय २० रा जवाहरनगर झोपडपटटी कंदलगांव नाका, कोल्हापूर, ५) रोहित सुरेश कदम २१ रा.जवाहरनगर झोपडपटटी कंदलगांव नाका, कोल्हापूर अशी सांगीतली त्यांचे कडुन गुन्हयातील गेले मालापैकी रोख रक्कम २,५०,०००/- गुन्हयात वापरलेली १ लाख रुपये किंतीची सुझुकी एक्सेस मोपेड क्रमांक एम.एच.०९ जी.एल. ९२४१ आरोपी २० हजार रुपये किमंतीचे दोन मोबाईल असा एकुण ३,७०,०००/-रुपये चा माल कायदेशिर प्रक्रिया करुन हस्तगत केलेला आहे. सदरचे आरोपी पुढील कारवाई करीता राजारामपूरी पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आले.

ही कामगीरी महेंद्र पंडित, पोलीस अधीक्षक कोल्हापूर, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर, सहा पोलीस निरीक्षक, चेतन मसुटगे, पोलीस अमंलदार वैभव पाटील, गजानन गुरव, संतोष बर्गे, प्रविण पाटील, प्रदिप पाटील, महेंद्र कोरवी, विशाल सराडे, विलास किरोळकर यांनी केला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes