कोल्हापूर : पाणीपुरवठा विभागाकडील 5 वसुली पथकामार्फत रु.1 कोटी 31 लाख इतकी थकीत रक्कम वसुल
schedule02 Jan 25 person by visibility 285 categoryमहानगरपालिका
कोल्हापुर : महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाकडून शहर तसेच ग्रामीण भागातील मोठे थकबाकीदार, अनाधिकृत कनेक्शनधारकांचे नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. दि.10 डिसेंबर 2024 पासुन आजअखेर पाणीपुरवठा विभागातील 5 वसुली पथकामार्फत रु.1,31,22,299/- इतकी थकीत रक्कम वसुल करण्यात आली आहे. तसेच नागरी सुविधा केंद्रामध्ये पाणी बील 3,87,75,328/- व सांडपाणी रक्कम रुपये 86,30,486/- असे रु.4,74,02,814/- रुपये इतकी रक्कम वसुल करण्यात आली. तसेच 5 वसुली पथक व 5 नागरी सुविधा केंद्रामार्फत रु.6,05,28,113/- पाणी बील वसुली करण्यात आली. या मोहिमेमध्ये आज अखेर 241 नळकनेक्शन बंद केली आहेत.
सदरची कारवाई प्रशासक के मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्तसो राहुल रोकडे व जल अभियंता हर्षजीत घाटगे, पाणीपट्टी अधिक्षक प्रशांत पंडत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमध्ये शाखा अभियंता राजेंद्र हुजरे, मयुरी पटवेगार, प्रिया पाटील, अनुराधा वांडरे, महानंदा सुर्यवंशी, पथक प्रमुख अजित मोहिते, मधुकर कदम, अमर बागल, नरेंद्र प्रभावळकर, संजय पाटील यांनी सहभाग घेतला.
ही मोहीम येथुन पुढेही सुरु राहणार असून शहरातील नागरिकांनी आपली अनाधिकृत नळ कनेक्शन रितसर अर्ज करुन व योग्य ते शुल्क भरुन नियमित करुन घ्यावी. तसेच पाणी बिलाची रक्कम वेळेवर भरणा करावे. अन्यथा सदरचे नळ कनेक्शन बंद करणे, वर्तमानपत्रात थकबाकीदाराचे नाव प्रसिध्द करणे, मिळकतीवर बोजा नोंद करणे यासारखे कटु प्रसंग टाळावेत असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.