कोल्हापूर महानगरपालिका : राधानगरी रोडवरील सिटी डेंटल ॲण्ड एम्पीलिमेंट सेंटरला पंचवीस हजाराचा दंड
schedule15 Apr 25 person by visibility 433 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : सानेगुरुजी वसाहत, राधानगरी रोडवरील सिटी डेंटल ॲण्ड एम्पीलिमेंट सेंटरने त्यांचे हॉस्पिटलमधील जैव वैद्यकिय कचरा उघड्यावर टाकल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना आज रु.25 हजाराचा दंड करण्यात आला. सदरची कारवाई सहा.आयुक्त कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडील आरोग्य निरीक्षक श्रीराज होळकर, मुकादम योगेश बनसोडे, अमय गर्दनकर यांनी केली.
सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील हे शहरात फिरती करत असताना राधानगरी रोड, पुईखडी जवळील पेट्रोल पंपाच्या समोर साधारणपणे 200 इंजेक्शनच्या सिरींज, 20 रक्ताळलेले कापूस, स्पंज व 15 सलाईन बॉटल इत्यादी साहित्य आढळून आले. त्यामुळे त्याची तपासणी करुन संबंधित वैद्यकीय आस्थापन यांच्याविरुद्ध कारवाई करून वैद्यकिय कचरा उघड्यावर टाकल्याबद्दल रुपये 25 हजाराचा दंड करण्यात आला.
तरी कोल्हापूर शहरातील व शहरालगचे सर्व वैद्यकिय व्यवसायिकांना आवाहन करणेत येत की, सर्व वैद्यकिय व्यवसायिकांनी त्यांचे आस्थापनामध्ये निर्माण होणारा जैव वैद्यकिय कचरा कोल्हापूर महानगरपालिकेने अधिकृत केलेल्या वाहनांकडेच देणेचा आहे. अन्यथा सदरचा कचरा इतरत्र उघडयावर, नाल्यामध्ये टाकल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित आस्थापनेवर जैव वैद्यकिय कचरा व्यवस्थापन व नियंत्रण अधिनियम 1998 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल याची संबंधीतांनी नोंद घ्यावी असे आवाहन आरोग्य घनकचरा विभागामार्फत करण्यात आले आहे.