कोल्हापूर महापालिकेच्यावतीने अग्निशमन सेवा दिन साजरा
schedule14 Apr 25 person by visibility 358 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : दि.14 एप्रिल 1944 या दिवशी एस.एस.फोर्ट स्टिकींग जहाजला विक्टोरीया डॉक मुंबई बंदरावर भिषण आग लागली होती. ती आग विझवताना अग्निशमनाचे 55 जवान शहीद झाले यांच्या बलिदानाबद्दल अग्निशमन सेवा दिन व सप्ताह साजरा करण्यात येतो.
अग्निशमन सेवा दिनानिमित्त सासने ग्राऊंड येथे महापालिकेच्यावतीने अग्निशमन केंदात अग्निशमन सेवा बजावत असताना प्राणाची आहुती देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मानवंदना, श्रध्दांजली व पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले. या कार्यक्रमात फायर गीत गाऊन हुतात्म्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त कपिल जगताप, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत , मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिषे व अग्निशमन दलाचे जवान व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ताराराणी फायर स्टेशन-कावळानाका, व्हिनस कॉर्नर, लक्ष्मीपूरी-बिंदू चौक, छ.शिवाजी महाराज चौक व महापालिका मुख्य कार्यालयापर्यन्त अग्निशमन गाडी व दुचाकीवरुन रॅली काढण्यात आली.
महापालिका अग्निशमन दलाच्यावतीने दि. 14 एप्रिल 2025 ते दि. 20 एप्रिल 2025 पर्यंत अग्निशमन सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे, यामध्ये हॉस्पिटल, शाळा, कॉलेज व सार्वजनिक ठिकाणी अग्निशमन दलाची सुरक्षेच्या दृष्टीने प्रात्याक्षिके दाखविण्यात येणार आहेत.