+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustलोकसभा निवडणूक 2024 : गुरुवारी कोल्हापूरसाठी 12 उमेदवारांनी 16 तर हातकणंगलेसाठी 14 उमेदवारांनी 17 नामनिर्देशनपत्रे केली दाखल adjustयशवंत विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक यांचा सत्कार समारंभ उत्साहात adjustघरफाळा विभागाच्यावतीने 1 लाख 58 हजार 500 बिले जनरेट adjustभारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ adjustलोकसभा निवडणूक 2024 : माढ्यातील उमेदवाराची अर्ज भरण्यासाठी चक्क रेड्यावरुन एन्ट्री adjustघोडावत विद्यापीठातील कॉमर्स व मॅनॅजमेण्ट विभागाच्या ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustपरगावी असणाऱ्या कोल्हापूरकरांनी 7 मे रोजी मतदानासाठी येण्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी, अमोल येडगे यांचे आवाहन adjustदुग्ध व्यवसायामुळेच शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती : अरुण डोंगळे; कुशिरे येथे दूध उत्पादकांना जातिवंत म्हैशी प्रदान करण्याचा कार्यक्रम adjustआरटीई 25 टक्के अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustकोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर, हातकणंगलेत परिसरात जोरदार पाऊस
Photo_1712720584815~2
Photo_1711784304922~2
SMP_news_Gokul_ghee
schedule03 Mar 23 person by visibility 1963 categoryक्रीडा
 
कोल्हापूर  : लोकराजा राजर्षि  छत्रपती  शाहूंच्या  राजाश्रयाने  कोल्हापूर क्रिडा परंपरेचा पाया मजबूत झाला. भावी पिढी निर्व्यसनी, सक्षम, आरोग्यदायी घडविणेसाठी आणि प्राचीन कुस्तीच्या जतन संवर्धनाच्या उद्देशाने राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरात तालीम पंरपरा सुरू केली. तसेच विविध क्रिडा प्रकारांना प्रोत्साहन 
दिले.
            कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने कोल्हापूर महानगरपालिका चषक फुटबॉल स्पर्धा सन 2023 दिनांक 6 ते 19 मार्च 2023 या कालावधीत छत्रपती शाहू स्टेडियम येथे भरविली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये शहर हद्दीतील  14 नामांकित संघसहभाग असणार आहे. सदर स्पर्ध्येतून कोल्हापूर स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा अभियान   तसेच  इतर  शासकीय  योजनाचा प्रसार करणेत येणार आहे.
            विजयी संघास रु.1 लाख 50 हजार व चषक, उपविजेत्या संघास 75 हजार व चषक असे बक्षीसाचे स्वरुप असणार आहे. याशिवाय उत्कृष्ठ गोलकिपर, उत्कृष्ठ डिफेन्स, उत्कृष्ठ हाफ, उत्कृष्ठ फॉरवर्ड खेळाडूस प्रत्येक रुपये 10,000/- व चषक व संपुर्ण स्पर्धेतील उत्कृष्ठ खेळाडूस रुपये 20,000/- व चषक असे बक्षीस देण्यात येणार आहे. व स्पर्धेतील पहिल्या फेरीत बाद होणाऱ्या आठ संघास प्रत्येकी रुपये 5,000/- व दुसऱ्या फेरीत बाद होणाऱ्या संघास प्रत्येकी रुपये 10,000/- देणेत येणार आहे. उपांत्य सामना पराभूत दोन्ही संघास रु. 20 हजार बक्षीस देण्यात येणार आहे.
सर्व फुटबॉल स्पर्धा या  बाद  पध्दतीने  खेळविण्यात  येणार  आहेत. 

कोल्हापूर स्पोटर्स असोसिएशन व कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशन यांचे नियमानुसारच स्पर्धा पार पडतील.
 फुटबॉल  स्पर्धे  ठिकाणी  सिक्युरिटीसाठी  महापालिकेच्या  अग्निशमन विभागाकडील कर्मचारी, प्रथमोपचार व्यवस्थेसाठी महापालिका आरोग्य विभागाकडील ऍ़म्ब्युलन्स व फिजोओथेरपीस्ट उपलब्ध असतील. तसेच कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशन मार्फत क्लोज सर्किट कॅमेरा सुविधा पुरविल्या जाणार आहे.

तरी जास्तीत जास्त फूटबॉल प्रेमी यांनी स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत करणेत येत आहे.