कोल्हापूर : ई वॉर्ड कावळानाका वितरण विभागाअंतर्गत टेंबलाई बैठी टाकी येथे रेल्वे लाईन ते टेंबलाई टाकीपर्यंत टाकण्यात आलेल्या ५०० मी.मी व्यासाचे वितरण नलिकेस क्रॉस कनेक्शन करण्याचे काम करण्यात येणार आहे. हे काम शुक्रवार दिनांक १८ ते २० फेब्रुवारी २०२२ अखेर करण्यात येणार आहे.
त्यामुळे विक्रमनगर, टेंबलाईवाडी, मिलेटरी बटालीयन व जामसांडेकर माळ भागातील नागरीकांना दैनंदिन होणारा पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. या परिसरातील नागरीकांना पिण्याच्या पाण्याची सोय होण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेकडील उपलब्ध टँकरव्दारे पाणी वाटप करण्यात येणार आहे. तरी या भागातील नागरीकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.