SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शक्तीपीठ महामार्ग विरोधी लढा : बांधा ते वर्धा मे अखेरीस संघर्ष यात्रा काढणार : आमदार सतेज पाटीलकोल्हापूर महानगरपालिकेतर्फे एअर रायफल ट्रेनिंगचे 10 मे पासून प्रशिक्षण सुरुडी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात बौद्धिक संपत्ती अधिकार कक्षाची स्थापना; मायक्रेव्ह कन्सल्टंसी समवेत सामंजस्य करारसकारात्मक सुरुवात, सातत्य, संयम ठेवा स्वप्न साध्य होईल : ईशा झंवर; केआयटी प्रचंड उत्साहामध्ये ई-समीट संपन्नकोल्हापूर महापालिकेसमोर खेळणी रचून 'आप'चे आंदोलन; उद्यानातील मोडकी खेळणी बदलण्याची मागणीशक्तीपीठ महामार्गा विरोधातील शेतकऱ्याची आज ऑनलाईन राज्यव्यापी बैठकतेज रोलर स्केटिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यशभारताच्या सैन्यदलाला सलाम ! जयहिंद !!निकालानंतर 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची मोफत सेवाडीकेटीईच्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्नीकमध्ये एआयएमएल व मेकॅट्रॉनिक्स पदविका अभ्यासक्रमांना एआयसीटीई, दिल्लीकडून मान्यता; दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांस सुवर्णसंधी

जाहिरात

 

'या' कामामुळे सोमवारी, मंगळवारी कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा बंद

schedule09 Mar 25 person by visibility 362 categoryउद्योग

▪️बालिंगा योजनेवर अवलंबून असणा-या सी व डी वॉर्डमधील पाणी पुरवठा सुरू राहणार
कोल्हापूर  : काळम्मावाडी योजनेची देखभाल दुरूस्ती व अमृत योजनेवरील मुख्य लाईनवरील क्रॉस कनेक्शनची कामे सोमवार व मंगळवार, दि.10 व 11 मार्च 2025 रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर शहर व सलग्नित उपनगरे आणि ग्रामिण भागातील नागरिकांना सोमवारी व मंगळवारी पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. तसेच बुधवार, दि.12 मार्च 2025 रोजी होणारा पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल. तसेच बालिंगा योजनेवर अवलंबून असणा-या सी व डी वॉर्डमधील नागरीकांचा पाणी पुरवठा सुरू राहणार आहे.

  यामध्ये ए, बी, वॉर्ड अंतर्गत फुलेवाडी रिंगरोड, गजानन कॉलनी, जयभवानी कॉलनी, अयोध्या कॉलनी, गजानन कॉलनी, लक्ष्मीनारायण कॉलनी, संतसेना, अभीयंता कॉलनी मातंग वसाहत, बोंद्रेनगर, शिवशक्ती नगर, मथूरानगरी, धनगरवाडा, इंगवले कॉलनी, गडकरी कॉलनी, कोतवाल नगर, नृसिंह कॉलनी, सतयाई कॉलनी, राज्याभिषेक कॉलनी, डायना कॅसल, अष्टविनायक कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, धनगरवाडा, माऊली नगर, दत्तकॉलनी व पुर्ण रिंगरोड, नाना पाटीलनगर, बीडी कॉलनी, राजोपाध्ये नगर, राजेसंभाजीनगर, गंधर्व नगरी, तुळजाभवानी कॉलनी, महादेव नगरी, पांडुरंगनगरी, सर्वे कॉलनी, गणेश कॉलनी, टाकळकर कॉलनी, संपुर्ण राधानगरी रोड परिसर, 

हरिओम नगर, मोहिते मळा, इंद्रपस्थनगर परिसर, देवणे कॉलनी, सुश्रृषा नगरी, महालक्ष्मी पार्क, केदार पार्क, शिवराम पोवार कॉलनी, क्रशर चौक झोपडपटटी, गजलक्ष्मी पार्क, व राधानगरी रोड परिसर सलग्नीत ग्रामिण भाग व ई वॉर्ड अंतर्गत संपूर्ण राजारामपुरी परिसर, शाहुमिल कॉलनी, वैभव हौसिंग सोसायटी, ग्रीनपार्क, शांतीनिकेतन परिसर, रेव्हेन्यु कॉलनी, अरूणोदय परिसर, राजेंद्रनगर, चौगुले हायस्कुल परिसर, सम्राट नगर, प्रतिकानगर, इंगळेनगर, दौलतनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर, पांजरपोळ परिसर,  नवश्या मारूती चौक, दत्तगल्ली, यादवनगर, कामगार चाळ, पंत मंदीर परिसर, जगदाळे कॉलनी, महावीरनगर, अश्विनीनगर, जागृतीनगर, पायमल वसाहत, अंबाई डीफेन्स परिसर, राजाराम रायफल, काटकरमाळ, कावळानाका, संपूर्ण कसबा बावडा, लाईन बाजार, लोणार वसाहत, राजीव गांधी वसाहत, महाडीक वसाहत,

 

रूईकर कॉलनी, लिशा हॉटेल परिसर, सदर बाजार, कदमवाडी, जाधववाडी, बापट कॅम्प, शिवाजी पार्क, फ्रेंड्स कॉलनी, ताराबाई पार्क, नागाळापार्क, रमणमळा, शाहुपूरी व्यापार पेठ, व्हीनस कॉर्नर, शाहुपूरी 1 ते 4 गल्ली, बी.टी.कॉलेज परिसर, साईक्स एक्स्टेन्शन, पाच बंगला परिसर या भागामध्ये पाणी पुरवठा होणार नाही. तरी या भागातील नागरिकांनी सोमवार व मंगळवार, दि.10 व 11 मार्च 2025 रोजी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes