छत्तीसगड येथे नक्षलवादी हल्ला, ब्लास्टमध्ये 9 जवान शहीद
schedule06 Jan 25 person by visibility 164 categoryदेश
नवी दिल्ली : छत्तीसगडमधील विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. कुटुरू रोड येथे नक्षलवाद्यांनी आयईडी पेरला होता, सुरक्षा दलाची वाहने जाताना हा स्फोट झाला. या IED स्फोटात 9 जवान शहीद झाले आहेत. 6 हून अधिक जवान गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे.
जेव्हा दंतेवाडा, नारायणपूर आणि विजापूरची संयुक्त ऑपरेशन करुन परतत होती. त्यावेळी दुपारी २.१५ वाजताह कुटरु ठाणे क्षेत्रातील अंबेली गावाजवळ नक्षलवाद्यांनी घात लावून हा ब्लास्ट घडवला. या ब्लास्टमध्ये लष्कराचे वाहन टार्गेट होऊन मोठी जिवीतहानी झाली आहे. या ब्लास्टमध्ये दंतेवाडा येतील आठ डीआरजी जवान आणि एक ड्रायव्हर सह नऊ जवान शहीद झाले आहेत.
जेव्हा जेव्हा सरकार नक्षलवाद्यांविरोधात अशा प्रकारेचे मोठे ऑपरेशन करते तेव्हा नक्षलवादी अशा प्रकारचे भ्याड हल्ले करतात असे छत्तीसगडचे विधानसभा अध्यक्ष रमन सिंह यानी म्हटले आहे. सरकार या भ्याड हल्ल्यांना घाबरणार नाही. त्यांच्या विरोधाक कठोर कारवाई सुरु राहील असेही ते यावेळी म्हणाले आहे.