डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये आज रविवारी ऑस्कॉन -२०२४ नेत्र परिषद
schedule16 Jun 24 person by visibility 391 categoryआरोग्य
कोल्हापूर : ऑप्थॉलमॉलॉजीकल सोसायटी ऑफ काेल्हापूर, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज आणि डिपार्टमेंट ऑफ ऑप्थालमॉलॉजी तसेच महाराष्ट्र आप्थॉलमॉलॉजीकल सोसायटी यांच्यातर्फे आज रविवार दि. १६ जून रोजी ऑस्कॉन २०२४ या नेत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या सभागृहात सकाळी १०.३० वाजता उद्घाटन होणार आहे.
सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत होणाऱ्या या नेत्र परिषदेत कॉर्निया सत्रात डॉ. हिंमाशू मतालिया, डॉ. नताशा पाहुजा, डॉ. जीनव लाडी, पिडियाट्रिक सत्रात डॉ. ज्योती मतालिया, डॉ. मिलिंद किल्लेदार, डॉ. दीप्ती जोंशी आणि रेटीनासंदर्भात डॉ. पियूष बन्सल, डॉ. शरद भोमाज, तर कॅटरॅक्ट सत्रात डॉ. आर. बी. ओडियार आदी तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेत कॅटरॅक्ट, कॉर्निया, पिडियाट्रिक, आप्थॉलमॉलॉजी, रेट्रिना यासंदर्भात चर्चा होणार आहे. याशिवाय थेट शस्त्रक्रिया, केस स्टडी, मार्गदर्शन, चर्चा, वादविवाद, मनोरंजक प्रकरणे तसेच प्रश्नमंजुषांचेही आयोजन केलेले आहे. या परिषदेसाठी कोल्हापूर, सातारा, सांगली आणि बेळगाव येथून १२५ नेत्रतज्ञ उपस्थित राहणार आहेत.
सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्र आप्थॉलमॉलॉजीकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. संतोष आगरवाल हे या परिषदेचे उद्घाटन करणार असून डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे उपकुलगुरु प्रा. डॉ. राकेश कुमार मुदगल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय या समारंभासाठी डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. राकेश शर्मा आणि डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे रजिस्ट्रार डॉ. व्ही. व्ही. भोसले, डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल ॲन्ड मेडिकल रिसर्च सेंटरच्या मेडिकल सुपरिन्टेडेट डॉ. वैशाली गायकवाड आणि डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या नेत्र विभागाचे प्रमुख आणि सहखजानिस डाॅ. मिलिंद सबनीस उपस्थित राहणार आहेत.
ऑप्थॉलमॉलॉजीकल सोसायटी ऑफ काेल्हापूरचे अध्यक्ष डॉ. चेतन खारकांडे, उपाध्यक्ष डॉ. मंदार पाटील, सचिव डॉ. मंदार जोगळेकर, खजानिस डॉ. प्रीती मेहता, वैज्ञानिक समितीचे सचिव डॉ. गायत्री होशिंग, डॉ. अतुल कढाने, डॉ. वर्धमान कांकरिया, डॉ. मंदार परांजपे, डॉ. अदिती वाटवे यांनी या परिषदेचे आयोजन केले आहे.