SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शरद सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, उपाध्यक्षपदी पोपट भोकरे यांची निवड२६ ऑक्टोबर १९४७: जम्मू आणि काश्मीरचा भारतात ऐतिहासिक विलयशबरी नॅचरल्सच्या पॅकेजिंगमधून आदिवासी संस्कृतीचे दर्शन; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून गौरवनैना क्षेत्रात १५ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट; विकासाच्या संधींमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीत सुमारे सात लाख परीक्षार्थी सहभागीइंडिया ज्वेलरी पार्कमुळे महाराष्ट्र जागतिक दागिने उत्पादन व निर्यातीचे केंद्र बनेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसगोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेत महायुती तांत्रिक मुद्दा आणणार नाही : आमदार सतेज पाटील 'वोट बचाओ देश बचाओ' अभियान: लोकशाही धोक्यात आणणाऱ्या एसआयआर प्रक्रियेविरोधात काँग्रेसचा देशव्यापी एल्गारअर्जुनवाड येथील आरोग्य शिबिरात ५९५ नागरिकांची तपासणीउदय कुलकर्णी यांच्या आठवणींचे संकलन करून स्मृतीग्रंथ प्रकाशित करा

जाहिरात

 

परी डोईफोडे हिची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड!

schedule25 Oct 26 person by visibility 321 categoryसामाजिक

कोल्हापूर : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धेत प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थीनी  परी डोईफोडे हिने पीप साइट (U-19) प्रकारात 400 पैकी 399 गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. या नेत्रदीपक कामगिरीमुळे तिने सुवर्णपदक मिळवले असून तिची राष्ट्रीय स्तरावरील नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

परीने आपल्या अचूक नेमबाजीच्या जोरावर मिळवलेले हे यश तिच्या जिद्दीचे, चिकाटीचे आणि कठोर परिश्रमाचे फलित आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या यशासाठी परीला तिचे प्रशिक्षक, संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापिका  एस. आर. पाटील, उपमुख्याध्यापक  चोपदार सर, पर्यवेक्षक  भोई सर  आंबर्डेकर मॅडम, तसेच क्रीडाशिक्षिका  उमा भेंडिगिरी व वैजयंती पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

परीच्या या देदीप्यमान यशाबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून आगामी राष्ट्रीय स्पर्धेतही तिने उत्कृष्ट कामगिरी करून यशाची नवी शिखरे गाठावीत, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes