कळंबा उपसरपंचपदी पुनम जाधव बिनविरोध
schedule15 Apr 25 person by visibility 377 categoryराजकीय

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील कळंबा तर्फे ठाणे उपसरपंचपदी पुनम उत्तम जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच संदीप पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झाल्या पदावर पुनम जाधव यांची निवड करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करून जल्लोष व्यक्त केला. ग्रामपंचायतीवर आमदार सतेज पाटील गटाची सत्ता आहे.
यावेळी लोकनियुक्त सरपंच सुमन गुरव यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय अधिकारी विलास राबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मंगळवार दिनांक 15 एप्रिल रोजी उपसरपंच निवड प्रक्रिया पार पडली. पुनम जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य उदय जाधव, दीपक तिवले, छाया भवड, भाग्यश्री पाटोळे, रोहित मिरजे, विकास पवार- बावडेकर, पुनम जाधव, रोहित जगताप, संदीप पाटील, स्नेहल जाधव, मीना गौंड, नितीश शिंदे, स्वरूप पाटील, दिपाली रोपळकर, वैशाली टिपुगडे, आशा टिपुगडे, संगीता माने, तसेच माजी सरपंच विश्वास गुरव, उत्तम जाधव ग्रामपंचायत कर्मचारी प्रकाश खडके लक्ष्मण मिरजे महादेव तिवले अमोल पाटील विशाल सोनवणे निवृत्ती चौगुले ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
