SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
स्वच्छता मोहिमेत 25 टण प्लास्टिक, तणकट व खरमाती उठावटाकाळा येथील राजर्षी शाहू जलतरण तलावाची आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडून पाहणीराष्ट्रीय साखर तंत्रज्ञ असोसिएशनच्या कौन्सिल सदस्यपदी मनोहर जोशी यांची बिनविरोध निवडडिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे ४ मे रोजी पणजी गोवा येथे तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशनगोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा; अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण; श्री. महादेव दूध संस्थेची याचिका फेटाळलीपुणे विभागातील पहिले खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय वारणेत! ८० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू : आमदार विनय कोरेशिवाजी विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी‘डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनींची नेदरलँडमधील सॅक्सॉन युनिव्हर्सिटीत दैदिप्यमान कामगिरी’बालकामगार : कारणे, परिणाम आणि उपाययोजनाराष्ट्रसंत तुकडोजी महाराज: एक युगद्रष्टा समाजसुधारक

जाहिरात

 

प्रा. वसिफा कोतवाल यांना डॉक्टरेट

schedule14 Mar 26 person by visibility 280 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक, कसबा बावडा येथील कॉम्प्युटर इंजिनियरिंग विभागातील सहाय्यक प्राध्यापक वसिफा समीर कोतवाल यांनी डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे या  विद्यापीठाकडून डॉक्टरेट (पीएचडी ) प्राप्त केली आहे.

"एआय अँड आयओटी बेस्ड इंटिग्रेटेड सिस्टीम फॉर स्मार्ट वॉटर मॉनिटरिंग अँड डिस्ट्रीब्यूशन " या विषयावर त्यांनी संशोधन करून शोधप्रबंध  सादर केला. हे संशोधन त्यांनी प्रा. डॉ. संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पूर्ण केले. 

डॉ. वसिफा कोतवाल यांच्या संशोधनामध्ये रिअल-टाइम आयओटी आधारित सेन्सिंग आणि एआयच्या साहाय्याने पाण्याच्या गुणवत्तेचे, प्रवाहाचे व दाबाचे त्वरित निरीक्षण करणे, प्रभागनिहाय अचूक पाणी मागणीचा अंदाज व नियोजन करणे, योग्य पाणी पुरवठासाठी सुलभ व वापरकर्ता-अनुकूल डॅशबोर्ड विकसित करणे या प्रणालीचा समावेश आहे.

यासाठी कुलपती डॉ. संजय डी. पाटील, प्र - कुलपती ऋतुराज  पाटील, कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, कुलसचिव डॉ. जे. ए. खोत ,डॉ.जयदीप पाटील, प्राचार्य डॉ. महादेव नरके,डॉ.समीर कोतवाल यांचे मार्गदर्शन व पाठबळ लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes