SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
भारतीय लोकशाहीचा पोलादी आराखडा: राष्ट्रीय नागरी सेवा दिनकोल्हापूर जिल्ह्यातील २९ हजार कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार होणार; शासकीय जमिनीवरील २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमानुकूल होणारराधानगरी तालुक्यातील अवसायनात संस्थांच्या सुनावणीस गती द्या : अभिजीत तायशेटे, संचालक, गोकुळ दूध संघ कोल्हापूर येथील नियोजित फिश मार्केटला आवश्यक मदत व निधी देऊ : मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेकोल्हापूर भूमी अभिलेख झाले ‘हायटेक’; ३ कोटी ६९ लाखांच्या आधुनिक यंत्रसामग्रीचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वितरणदीड वर्षांपासून रखडले काम; उचगाव-गडमुडशिंगी रस्त्यासाठी शिवसेना मैदानात!महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल; ९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जाहीर; सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव आदी जिल्ह्याचा समावेश भारतीय हवाई दलाचे ‘फ्लाईट सिम्युलेटर’ बनले विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू; केआयटी मध्ये भारतीय वायुदलाचा विशेष जनजागृती कार्यक्रमजागतिक कला व वारसा दिनानिमित्त विद्यापीठात ‘रंग कुंचल्याचे’ स्पर्धामहात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांच्या अनुबंधाविषयी शिवाजी विद्यापीठात गुरूवारी चर्चासत्र

जाहिरात

 

परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

schedule06 Feb 26 person by visibility 287 categoryराज्य

कोल्हापूर  : जिल्ह्यात उच्च माध्यमिक (इयत्ता 12 वी) साठी 73 तर माध्यमिक शालांत (इयत्ता 10 वी) साठी 141 परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. परीक्षा प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी तसेच परीक्षा केंद्रांच्या परिसरात शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत (ज्या दिवशी परीक्षा नाही त्या दिवशी वगळून) दररोज सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत परीक्षा केंद्रे व उपकेंद्रांच्या 100 मीटर परिसरात मोबाईल फोन जवळ बाळगणे, कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य वापरणे किंवा बाळगणे, तसेच झेरॉक्स/ फॅक्स मशीन आणि लॅपटॉपचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 नुसार शिक्षेस पात्र राहिल. परीक्षेच्या कामकाजासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या कामकाजासाठी आवश्यक असलेली उपकरणे वापरण्यास ही बंदी लागू राहणार नाही.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes