लोककल्याण मेळाव्यात अन्नसुरक्षा प्रशिक्षणास फेरीवाल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
schedule29 Sep 25 person by visibility 150 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या पी.एम.स्वनिधी योजनेअंतर्गत दि.१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत लोककल्याण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत आज दसरा चौक येथील शाहू स्मारक सभागृहात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत शहरातील अन्नविषयक व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांसाठी अन्नसुरक्षा (Food Safety) विषयक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा शुभारंभ उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सह.आयुक्त स्वाती दुधाने यांनी वृक्षास पाणी घालून केली.
या प्रशिक्षणास शहरातील ६४० पेक्षा जास्त फेरीवाले उपस्थित राहिले. यावेळी काही लाभार्थ्यांना कर्ज मंजुरी पत्रांचे वितरणही करण्यात आले. उपआयुक्त किरणकुमार धनवाडे यांनी या प्रसंगी मार्गदर्शन करताना "पी.एम. स्वनिधी योजनेतून फेरीवाल्यांचे उत्कृष्ट काम होत असून अधिकाधिक लाभार्थ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमास सह.आयुक्त स्वाती दुधाने, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश पवार, FSSAI समन्वयक श्रीमती क्रांती पात्रे, शहर पथ विक्रेता समिती सदस्य दिलीप पवार, किरण गवळी, शेवंता जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच बँकांचे प्रतिनिधी, Bharat Pay चे अधिकारी, NULM विभागातील अधिकारी निवास कोळी, विजय तळेकर, रोहित सोनुले, समुदाय संघटक स्वाती शहा, अंजनी सौंदलगेकर, CLC व्यवस्थापक वृषाली पाटील आदींनी फेरीवाल्यांना PM SVANIDHI व FSSAI संदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित सोनुले यांनी केले.