डॉ. डी वाय पाटील पॉलीटेक्नीकमध्ये रास रंग दांडिया उत्साहात संपन्न
schedule29 Sep 25 person by visibility 158 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : कसबा बावडा येथील डॉ. डी वाय पाटील पॉलीटेक्नीकमध्ये रास रंग दांडिया मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यामध्ये आयोजित स्पर्धेत सृष्टी कोळी आणि तनिष्का पोळ यांनी प्रथम तर सई नांगरे पाटील आणि आँचल झ्याड यांनी द्वितीय तर प्रणाली शिंदे आणि पूर्वा तोडकर यांनी तिसरा क्रमांक मिळवला.
डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता आणि सीएचआरओ श्रीलेखा साटम यांच्या हस्ते आणि प्राचार्य डॉ. महादेव नरके यांच्या उपस्थितीत रास रंगचे उद्घाटन झाले. परीक्षक म्हणून प्रा पूजा पाटील , प्रा.आदिती साळोखे यांनी काम पाहिले.
विजेत्यांना प्राचार्य डॉ महादेव नरके यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. यावेळी उपप्राचार्य नितीन माळी, विभागप्रमुख डॉ.पी. के. शिंदे, प्रा. एस. बी. शिंदे, प्रा. अक्षय करपे, यांच्यासह स्टाफ उपस्थित होते.
प्रा. शितल साळोखे, प्रा.ऐश्वर्या पाटील, प्रा अजय बंगडे , प्रा. सूरज जाधव, प्रा. राज आलासकर तसेच आर्यन कांबळे, आर्यन खोत , वनराज चौगुले, अथर्व टिक्के आणि सांस्कृतिक विभागाने संयोजन केले.