अपंग मुलांच्या तपासणीस आज पासून प्रारंभ
schedule30 Sep 25 person by visibility 138 categoryआरोग्य

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत शून्य ते सहा व सात ते अठरा या वयोगटातील दिव्यांग मुलांचे शीघ्र निदान व त्यावर पुढील उपचार करण्याच्या अनुषंगाने आजपासून म्हणजेच 1ते 10ऑक्टोबर या कालावधीत छत्रपती प्रमिला राजे (सीपीआर) रुग्णालय येथे तपासणी शिबिरास प्रारंभ होणार आहे .
या तपासणी शिबिराच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली .याकालावधीत तपासण्यात आलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना सहाय्यक साहित्य, प्रमाणपत्र व युडीआयडी (UDID) कार्डचे वितरण करण्यात येणार आहे .
तसेच त्यांच्यापर्यंत विविध शासकीय योजनांची माहिती पोहोचवण्याकरिता शनिवार दिन 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 11वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे तसेच प्रमुख जिल्हा न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
या दिवशी नॅब , रेड क्रॉस , बालगृह ,प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र , DEIC, जिल्हा परिषद ,महानगरपालिका ,विधी सेवा प्राधिकरण ,शिवाजी विद्यापीठ ,जिल्हा रुग्णालय ,एस टी महामंडळ व चेतना व्यवसाय प्रशिक्षण केंद्र आदींचे स्टॉल लावण्यात येणार आहेत .
या बैठकीसाठी जि .प .चे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन .एस,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दिपाली डोईफोडे, साधना कांबळे, राजेंद्र माने ,गौतम भोसले ,तुषार काटकर , संतोष गायकवाड अभिनंदन देशमुख आदी उपस्थित होते .