SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
रग्गेडियनच्या ‘रंगताली’ दांडिया-गरबा नाईटला कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसादमहायुतीच्या ऐतिहासिक विजयात राधानगरी- भुदरगडचा सिंहाचा वाटा असेल; पालकमंत्री प्रकाश आबिटकर व माजी आमदार के. पी. पाटील यांचा विश्वासआंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम न्यूनीकरण दिन: एक महत्त्वपूर्ण जागतिक मोहीमकोल्हापूर जिल्ह्यात 26 ऑक्टोबरपर्यंत बंदी आदेश लागूपोलीस स्मृती दिनी पोलीस हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून वाहणार श्रद्धांजलीशिवसेना नगरसेवक आक्रमक; विविध मागण्यांसाठी आयुक्तांना निवेदन!सखोल वैद्यकीय ज्ञान घेऊन आदर्श डॉक्टर बना : डॉ. संजय डी. पाटीलसीपीआरमध्ये कवटीच्या तळाशी संबंधित अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया पहिल्यांदाच यशस्वीधरणगुत्तीत आरोग्य शिबिरात ५३० नागरिकांची तपासणीसेवा संकल्प अभियानांतर्गत १६ हजार ६८३ दाखल्यांचे वितरण

जाहिरात

 

संजय घोडावत इस्न्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागाच्या दोन विद्यार्थ्यांची “इन्फ्रा मार्केट प्रायव्हेट लिमिटेड” कंपनीमध्ये निवड

schedule20 May 24 person by visibility 744 categoryशैक्षणिक

जयसिंगपूर: शिक्षण क्ष्रेत्रात आपले नाव भारताच्या कानाकोपऱ्यात निर्माण केलेले संजय घोडावत इस्न्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागातील सिव्हील इंजिनीरिंगच्या आर्यन शिंगे, जयंत दीक्षित या दोन विद्यार्थ्याची ‘इन्फ्रा मार्केट प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीमध्ये निवड झाली आहे. या दोन्ही विध्यार्थ्यांना ३.०० लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळाले आहे. 

संजय घोडावत इस्न्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कंपन्यांचे कॅम्पस ड्राईव्ह आयोजित केले जातात. सिव्हील इंजिनीरिंग क्षेत्रात ‘इन्फ्रा मार्केट प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीने आपला नावलौकिक प्राप्त केलेला आहे.

नैसर्गिक कलचाचणी, तांत्रिक फेरी, एच आर मुलाखत या निकषाच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या निवडीसाठी इस्न्टिट्यूटचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. आशिष पाटील, सिव्हील विभाग समन्वयक प्रा. एम. बी. पाटील, संदीप पिंपळे यांचे सहकार्य लाभले. 

या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, प्राचार्य, डॉ. विराट व्ही. गिरी, अकॅडमीक डीन, प्रा. प्रशांत पाटील, सिव्हील विभागप्रमुख प्रा. वंदना शहा यांनी सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes