SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
प्रकाशन विश्वातील प्रयोगशील, मार्गदर्शक दुवा निखळला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ प्रकाशक अनिल मेहता यांना श्रद्धांजलीतारळे उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम जलद गतीने पूर्ण करा; मार्च महिन्यात लोकार्पणाचे नियोजन : पालकमंत्री प्रकाश आबिटकरगोकुळमधील शासननियुक्त सदस्यांच्या निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार!, भगवा चौकात शासनाच्या पुतळ्याचे दहन; सोमवारी २५ हजारांहून अधिक नागरिकांचा भव्य मोर्चा निघणारउदगावच्या कुंजवन जैन मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्तमुंबईच्या मेट्रोत वारणा ब्रँडचा विस्तार/गिरगाव स्थानकात विक्री केंद्राचे उदघाटनकोल्हापुरात फुलेवाडी रिंगरोडवरील सराफ दुकानात दरोड्याचा प्रयत्न; ४ तासांत आरोपी जेरबंद, १ लाख ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगतशैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासह शाळांच्या संवर्धनासाठी ठोस कृती कार्यक्रम राबविणार!, नवनिर्वाचित शिक्षक आमदार कौस्तुभ गावडे यांची ग्वाहीपदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या विस्तारात महाराष्ट्राची दमदार झेपगोकुळसंदर्भातील राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात कोल्हापुरात संताप... राजेंद्रनगर चौकात ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ चा फलकप्रकाशशोधक भारतरत्न डॉ. सी. व्ही. रामन: भारतीय विज्ञानाचा देदीप्यमान तारा

जाहिरात

 

कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत विविध विकासकामांसह घंटागाडी व यंत्रणा पुरवठ्यावर गांभीर्याने चर्चा

schedule06 Nov 26 person by visibility 250 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर :  महानगरपालिकेच्या स्थायी समितीची महत्त्वाची सभा सभापती विशाल  शिराळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून, यामध्ये शहरातील विविध विकासकामांच्या मंजुरीसह यंत्रणा आणि कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या उपलब्धतेवर सदस्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. बैठकीत चांदणेनगर येथील जुने सार्वजनिक शौचालय पाडण्याच्या प्रस्तावासह विविध विभागांसाठी बाह्ययंत्रणेमार्फत मनुष्यबळ पुरविण्याच्या आणि नाले सफाईसाठी घेतलेल्या यंत्रसामग्रीच्या मुदतवाढीच्या विषयांवर सविस्तर चर्चा होऊन ते मंजुरीसाठी आले. बैठकीदरम्यान नगरसेवकांनी प्रभागांमधील कचरा उठाव, ट्रॅक्टर-ट्रॉली आणि उद्यान विभागाच्या कारभारावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. वर्ष संपत आले तरी बजेटचा निधी खर्च न झाल्याबद्दल सदस्यांनी नाराजी व्यक्त केली असून, आयुक्तांशी चर्चा करून निधी उपलब्धतेनुसार योग्य निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट करण्यात आले.

शहरातील स्वच्छता आणि कचरा उठावाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, वर्कशॉप विभागाकडून पुरेशी यंत्रणा मिळत नसल्याने नगरसेवकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ट्रॅक्टर-ट्रॉली आणि जेसीबीची वानवा असल्यामुळे खरमाती व कचरा उठाव रखडला असून, अनेक भागांत खासगी यंत्रणा लावावी लागत असल्याची तक्रार सदस्यांनी केली. यावर वर्कशॉप विभागाने ट्रॅक्टर-ट्रॉलीचा ठेकेदार निश्चित केला असून आयुक्तांच्या मंजुरीने यंत्रणा वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, तर महापालिकेला सीएसआरमधून लवकरच आणखी दोन बूम मिळणार असल्याने प्रत्येक विभागीय कार्यालयाला स्वतंत्र बूम उपलब्ध होईल असे सांगण्यात आले. 

याशिवाय, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लहान व्यावसायिकांना पुढील १५ दिवस विनाअडथळा व्यवसाय करू देण्याची आणि त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक वा हकालपट्टीची कारवाई न करण्याची आक्रमक भूमिका सभापतींनी घेतली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes