SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सोलापुरात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात; शिक्षक संघटना आणि शिक्षक नेत्यांचा भक्कम पाठिंबा!शिरटी येथील आरोग्य शिबिरात २७२ नागरिकांची तपासणी; आजअखेर आरोग्य अभियानातील लाभार्थ्यांची संख्या ८ हजार ८२७ वरशिक्षकांच्या प्रश्नांसाठी कौस्तुभ गावडे यांना पसंतीक्रमांक १ चे मत देऊन विजयी करा!दसरा महोत्सव शालेय बुद्धिबळ स्पर्धा: राजवर्धन, हर्ष आणि अमेय यांची दिमाखात आघाडी!शिक्षकांना कॅशलेस आरोग्य विमा, शिक्षिकांना विशेष रजा मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार!गोकुळ दूध संघ निवडणूक : आमदार सतेज पाटील यांनी गगनबावडा येथे बजावला मतदानाचा हक्कजागतिक रजोनिवृत्ती दिन: महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकतासेवा संकल्प अभियाना अंतर्गत उप जिल्हा रुग्णालय गांधीनगर येथे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम कोल्हापूर मार्फत 'फोकस ग्रुप डिस्कशन' चे आयोजनसोलापुरात कौस्तुभ गावडे यांची प्रचारात आघाडी; कौस्तुभ गावडे यांना शिक्षक आणि शिक्षण संस्थांचा वाढता पाठिंबा!पात्र शाळा व वाढीव तुकड्यांना वेळेत अनुदान मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार; सर्व पात्र संस्थांना १००% पूर्ण अनुदान मिळावे यासाठी आग्रही राहणार : शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे

जाहिरात

 

तुकोबांचे चौदा टाळकरी हे समूहभक्तीचे प्रतीक: डॉ. श्रीरंग गायकवाड

schedule19 Mar 25 person by visibility 864 categoryसामाजिक

कोल्हापूर : तुकोबांचे चौदा टाळकरी हे समूहभक्तीचे प्रतीक आहेत, असे प्रतिपादन डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाच्या वतीने तुकाराम बीजेनिमित्त आयोजित ‘संत तुकोबांचे चौदा टाळकरी’ या विशेष व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. येथील शाहू स्मारक भवनात  (दि. १७) झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

डॉ. गायकवाड म्हणाले की, संत तुकारामांच्या अभंगाचे संकलन करण्याचे मोलाचे काम तुकोबांच्या चौदा  टाळकऱ्यांनी केले. तुकोबांच्या सोबत असणारे चौदा टाळकरी समाजातील सर्व स्तरांतील होते. बहुजन समाजामध्ये जागृती करण्याचे काम त्यांनी केले. या चौदा टाळकऱ्यांच्या जीवनचरित्राचा आणि कार्याचा सविस्तर आढावा गायकवाड यांनी घेतला.

कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की, तुकारामाच्या चौदा टाळकऱ्यांचे कार्य समाजासमोर एक आदर्श आहे. निष्ठेचे मूर्तीमंत प्रतीक आहेत.

संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रणधीर शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले. यावेळी तुकाराम शिर्के, डॉ. डी. ए. देसाई, डॉ. अनिल गवळी, डॉ. शिवकुमार सोनाळकर, डॉ. संजय पाटील, मराठी विभागाचे संशोधक व एम.ए.चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes