SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
हाफकिन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चा : विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिरनेपाळ येथे अडकलेल्या नागरिकांसाठी मदत९८ लाखांच्या गंडा घालणारा 'लाईफमार्क'चा ठग जेरबंद! नाव बदलून लपलेल्या मुख्य संचालकासह एजंट पोलिसांच्या जाळ्यातकरवीर तालुक्यातील वडणगे मधील देवी पार्वती हायस्कूल मध्ये इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण समारंभ उत्साहातरंकाळा प्रदूषणमुक्तीच्या नावाखाली १२ कोटींचा ढपला पाडण्याचा घाट; शिवसेनेचा संतप्त सवाल - 'बहुतेक कोल्हापुरात एलियन्स आले की काय?'"युवकांनी एड्स मुक्तीचे दूत बनावे”पंचगंगा नदी परिसरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या कामांना गती द्या : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे लोकनृत्य महोत्सवातून राज्याच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा जागर प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे पालक सभा उत्साहात; विद्यार्थिनींच्या प्रगतीचे पालकांकडून कौतुकमहिला समानता दिन: समानतेच्या हक्काची आणि प्रगतीची नवी क्षितिजे

जाहिरात

 

शेंडा पार्क येथे सुरू असलेल्या विविध बांधकामाचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट करणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

schedule11 Jul 26 person by visibility 466 categoryराज्य

▪️मंत्री मुश्रीफ यांनी केली बांधकामांची पहाणी         

 कोल्हापूर :  शहरामध्ये शेंडा पार्क येथे वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे उभारण्यात येत असलेल्या ११०० बेड,६०० जनरल बेड,२५० कॅन्सर आणि २५० सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांचं बांधकाम हे अतिशय दर्जेदार व गुणवत्तापूर्वकच होईल यात शंका नाही. हे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर याची त्रयस्थ एजन्सीमार्फत तपासणी केली जाईल. त्या तपासणीनंतरच संबंधिताना बिल अदा केले जाईल, अशी स्पष्ट ग्वाही राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिली .

 कोल्हापुरातील काही माध्यमांमध्ये शेंडा पार्क येथे सुरू असलेल्या बांधकामाच्या कामांमध्ये त्रुटी असल्याचे वृत्त प्रसारीत झाले होते . त्या पार्श्वभूमीवर मंत्री श्री मुश्रीफ यांनी संबंधित बांधकामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी केली. या पहाणीनंतर बोलताना मुश्रीफ म्हणाले , एचएससी (HSC) म्हणजेच हॉस्पिटल बांधण्याचा ज्याला अनुभव आहे अशी केंद्र सरकारची प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी कंपनी (PMC) आहे .या कंपनीची नेमणुक महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण विभागाने केली आहे. या सर्व सुरू असलेल्या बांधकामाचे सगळे डिझाईन आयआयटी (IIT) कन्सल्ट करत असते आणि त्यानुसारच त्यांच्या कन्सल्टिंगने हे सगळं  काम सुरु असते. सध्या कार्यरत असलेली ही जी कंपनी आहे हिने देशभरामध्ये जवळ जवळ २०० हून अधिक हॉस्पिटल्स बांधलेली आहेत. तसेच या ठिकाणी जी NCC (नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी) कंपनी बांधकाम करते आहे ती आंध्र प्रदेशची असून या कंपनीची वार्षिक उलाढाल साधारणता 24 हजार कोटीची असून या कंपनीने विमानतळ, रस्ते, पूल , हॉस्पिटल्स , 26 मजली हॉस्टेल्स तसेच अनेक मोठ मोठ्या इमारतींची उभारणी देशभरामध्ये केली आहे.

 त्यामुळे या ही ठिकाणी सुरु असलेले काम दर्जेदारच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . तसेच जर बांधकामध्ये चुकून काही त्रुटी अथवा उणिवा आढळल्यास आयआयटीचं (IIT) सर्टिफिकेट घेतल्याशिवाय यांना कोणतंही बिल दिलं जाणार नाही नसल्याचे सांगितले .

या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो गरीब रुग्णांची सोय होणार असल्याने हे काम दर्जेदार होण्याकडे आपले अत्यंत बारकाईने लक्ष असल्याचे सांगून येत्या ३१ मार्च २०२७ पर्यंत ही तिन्ही हॉस्पिटल्स पूर्ण होवून त्याचे लोकार्पण होईल असा विश्वास मंत्री महोदयांनी यावेळी व्यक्त केला .                                                                        या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे जे २५० बेडचे जे बांधकाम त्या ठिकाणी किडनी, लिव्हर व हार्ट ट्रान्सप्लांट सारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा,लागणारे साहित्य व डॉक्टर्स यांचा पुरवठा होणार आहे .त्याचबरोबर कॅन्सरचे २५० बेडचं हॉस्पिटल्स आहे त्या ठिकणी नवी मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या गुणवत्तेइतकेच दर्जेदार असे वैद्यकीय उपचार कॅन्सर रुग्णांवर करण्यात येतील ज्याचा फायदा पश्चिम महाराष्ट्रासह लगतच्या कर्नाटक व गोवा राज्यालाही होईल . 
                    
◼️ काही माध्यमांमध्ये शेंडा पार्क येथे सुरू असलेल्या बांधकामाबाबत वृत्त प्रसारित झाल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी तब्येत बरी नसतानाही या ठिकाणी आपल्या तब्येतीची पर्वा न करता भेट दिली .तसेच बांधकामासंदर्भात माध्यमांनी ज्या त्रुटी दाखविल्या , त्या त्रुटींबद्दल माध्यमांचे आभार मानले. यावेळी त्यांच्यासोबत वैद्यकीय अधिष्ठाता डॉ सदानंद भिसे , डॉ . गिरीश कांबळे तसेच संबंधित कंत्राटदार आदी उपस्थित होते .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes