SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक शरणार्थी दिन: माणुसकीच्या नात्याने संघर्षाला सलामकेंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन व स्वागतविधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद!श्री अंबाबाई मंदिरातील विविध विकास कामांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार शुभारंभशालेय शिक्षण विभाग आणि गुगल दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार; राज्यातील चार लाख शिक्षकांना मिळणार लाभशिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेसाठी असलेली अधिवास प्रमाणपत्राची अट रद्दकोल्हापूर : जलजन्य व किटकजन्य आजार टाळण्यासाठी नागरिकांसाठी जाहीर आवाहनजागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त मंगळवारी क्रीडा ज्योत रॅलीआजरा येथे मंगळवारी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजनडी. वाय. पाटील अभियांत्रिकीचा 42 वर्षांचा प्रवास अभिमानास्पद; डॉ. संजय डी. पाटील यांचे प्रतिपादन, 43 वा स्थापना दिन उत्साहात

जाहिरात

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा

schedule18 Jun 26 person by visibility 235 categoryराजकीय

▪️राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांचे आवाहन
▪️कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेसची व्यापक बैठक
      
कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री व केंद्रीय सहकार मंत्री नामदार अमितजी शहा यांच्या कोल्हापूरमधील स्वागतासाठी शनिवारी दि. २० हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांनी केले. 
        
कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात नियोजनासाठी तालुकानिहाय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत  पाटील बोलत होते.
         
भाषणात आसुर्लेकर-पाटील पुढे म्हणाले, आपले नेते व वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या सूचनेनुसार  शहा यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी कोल्हापूर शहर, तालुके व गावोगावी सूक्ष्म नियोजन करा. गाव पातळीवरील अगदी बूथलेवल कार्यकर्ता, अध्यक्ष पदाधिका-यांपासून ते नेत्यांपर्यंत सूक्ष्म नियोजन करा. ग्रामसमन्वयकापासून पदाधिकाऱ्यापर्यंत, पंचायत समिती गणांचे प्रमुख पदाधिकारी व जिल्हा परिषद गटाचे सर्व प्रमुख पदाधिका-यांपासून तालुका कार्यकारिणी, विधानसभा मतदार संघ कार्यकारिणी या सर्वांनी अहोरात्र काम करा. जिल्ह्यात १३ नगरपालिका क्षेत्रातील शहराध्यक्षापासून ते नगराध्यक्ष व नगरसेवक, असे सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा.
             
या बैठकीला जिल्हा कार्याध्यक्ष अनिलराव साळोखे, इचलकरंजी शहराध्यक्ष सुहास जांभळे, नितीन दिंडे, अमरसिंह माने-पाटील, बाबासाहेब देशमुख, अमित गाताडे, आप्पासाहेब धनवडे, शिवाजी देसाई, युवराज पाटील, संभाजी पाटील -भुयेकर, विकास पाटील,  शिरीष देसाई, सुरेशराव चौगुले, सागर भावके आदी प्रमुख उपस्थित होते. 
          
स्वागत व प्रास्ताविक जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी केले. आभार इचलकरंजी शहराध्यक्ष सुहास जांभळे यांनी मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes