उत्तर प्रदेशात काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? प्रियंका गांधी यांनी फोडला राजकीय बॉम्ब!
schedule22 Jan 22 person by visibility 106 categoryराजकीय
उत्तर प्रदेश : युपीतलं राजकारण तापले आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांनी शनिवारी सकाळी एक राजकीय बॉम्ब फोडला असून त्याची देशात चर्चा सुरू आहे. काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? असं विचारल्यानंतर त्यांनी मीच तर सगळीकडे दिसतेय ! असं वक्तव्य केल्याने याची चर्चा संपुर्ण देशभर सुरू आहे.
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांनी युपीच्या तरूणांसाठी रोजगार निर्मिती योजनांची रूपरेषा देणारा जाहीरनामा प्रसिध्द केला आहे. प्रत्येक पक्षाकडून निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन लोकांना आश्वासने दिली आहेत. पण तिथे अधिक चुरस वाढल्याने नेमकं विजय कोणाचा होईल याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
एका कार्यक्रमात त्यांना एक प्रश्न विचारण्यात त्यांचं उत्तर देताना त्या सगळीकडे मीच तर दिसतेय ! असे म्हणाल्या आहेत. मात्र यावर त्यांनी स्पष्टीकरण देत काँग्रेस पक्ष हा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवत असतो. असे सांगून आपल्या वक्तव्यावरुन यू-टर्न घेतला आहे.