जागतिक महिला दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने विविध कार्यक्रम संपन्न
schedule09 Mar 25 person by visibility 334 categoryउद्योग

कोल्हापूर : जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने केएमसी कॉलेज येथे आज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिला अधिकारी, महिला कर्मचारी यांचेसाठी उखाणा स्पर्धा, नृत्य स्पर्धा व वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी महापालिकेच्या सर्व विभागातील अधिकारी व महिला कर्मचारी उपस्थित होत्या.
सहा.आयुक्त स्वाती दुधाणे, उज्वला शिंदे व महिला व बालकल्याण अधिक्षक प्रिती घाटोळे यांच्या हस्ते वृक्षास पाणी घालून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सहा.आयुक्त स्वाती दुधाणे यांनी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सहा.आयुक्त उज्वला शिंदे यांनी उपस्थित सर्व महिलांना यावेळी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षका गीता घाटगे व सारिका पाटील यांनी केले. तसेच या कार्यक्रमात शिक्षिका ऐश्वर्या पाटील, सरिता सुतार व उज्वला पटेल यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.
जागतिक महिला दिनानिमित्य केएमसी कॉलेज येथे उखाणा स्पर्धा, नृत्य स्पर्धा व वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या. त्याचबरोबर महापालिकेच्या महिला अधिकारी व कर्मचा-यांनी वैयक्तिक डांन्स सादर करुन आपल्या विविध कला गुणांचे सादरीकरण केले. यामध्ये महिला अधिकारी व कर्मचा-यांनी मोठया संख्येने सहभाग घेतला.
यावेळी वेशभूषा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पोर्णिमा कांबळे, द्वितीय क्रमांक गीता कांबळे यांनी पटकाविला. तर नृत्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पोर्णिमा कांबळे (लावणी), द्वितीय क्रमांक आर्या कांबळे (लावणी) यांनी पटकाविला. तसेच उखाना स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक अनुसया सुतार, द्वितीय क्रमांक शालाबाई शिंदे व तृतीय क्रमांक बनाबाई शिंदे यांनी पटकाविला. या सर्वांना सहा.आयुक्त स्वाती दुधाणे व उज्वला शिंदे यांनी प्रशस्तीपत्र व रोप देऊन सन्मान केला.