विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पन्हाळगडावर उत्साहात
schedule14 Apr 25 person by visibility 397 categoryसामाजिक

पन्हाळा : पन्हाळगडावर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉलमध्ये सकाळी 10.00 वा. ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी गावातील नागरिकांनी मनोगत व्यक्त केले.
भारतीय दलित महासंघाचे अध्यक्ष श्रीकांत कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ही जयंती फक्त दलित समाज मध्ये साजरी करता सगळ्यात जातीच्या धर्मातील लोकांनी जयंती साजरी करावी. प्रत्येकाच्या घरात ही जयंती साजरी व्हावी. असे त्यांनी सांगितले कारण की, बाबासाहेबांचे कार्य फक्त दलिता करिता मर्यादित नव्हते. देशातील सर्व समाजातील पुरुष-महिला यांच्यासाठी त्यांनी योगदान लाभले आहे.तसेच ही जयंती डॉल्बी च्या मिरवणुकीत साजरी न होता ही विचाराची जयंती साजरी व्हावी.असे त्यांनी यावेळी आपल्या मनोगत मध्ये सांगितले.
माजी नगराध्यक्ष रूपाली धडेल म्हणाल्या मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम घेऊन गावात जयंती साजरी करूया तसेच त्यानी सर्व नागरिकांचे आभार मानले. असिफ मोकाशी म्हणाले बाबासाहेबांचे व पन्हाळ्याचे नाते ही अतूट होते. ते पन्हाळगडावर आल्यानंतर किमान दीड-दोन महिने राहायचे ,छत्रपती घराण्याचे त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यावेळी अनेक जुन्या रुढी परंपरा त्यांनी इथल्या बंद केल्या होत्या .बारा बलुतेदारांना न्याय दिला होता. त्यांनी गडावर भरपूर परिश्रम घेतले होते. राजाराम महाराजांनी दूरदृष्टी ठेवून या विद्वान व्यक्तीचा येथे कायम सहवास लाभावा. यासाठी 49 गुंठे जमीन गडावर दिली होती. 1952 मध्ये झालेली लोकसभेची पहिली निवडणुकीची धोरण हे पन्हाळगडावरूनच बाबासाहेबांनी ठरवले होते. भाडेकर, गवंडी यांच्या घरात बसायला उठायला असायचे त्यामुळे येथील आमच्या पूर्वजांचे मित्र बाबासाहेब बनले होते. इथल्या स्थानिक घरगुती कार्यक्रमास उपस्थित त्यावेळी ते असायचे तसेच त्यांनी गोपाळ तीर्थ उद्यानामध्ये पाण्याच्या सत्याग्रह केला होता. अशी इतिहासामध्ये नोंद आहे.
आनंद हावळ म्हणाले गेले पंचवीस वर्षे मी दरवर्षी जयंतीसाठी येत आहे. परंतु ही जयंती विचाराची व्हावी. अशी मी प्रत्येक वेळा सांगत आहे. तरुणनी त्यात पुढाकार घेऊन विविध समाज उपयोगी शिबिरांचा कामांचा पुढाकार घेऊन जयंती साजरी करावी.
यावेळी लहान मुलीं आयशा कांबळे, अंजली धुळेकर, आरती कासे, अनुदा जंवजाळे, आदया जंवजाळे, प्रेरशा गवंडी, यांनी बाबासाहेबांबद्दल गीत, भाषण सादर केली.तसेच स्वरा अभिजीत गवंडी याचे जवाहर नवोदय मध्ये निवड झाल्याबद्दल या मुलीचा सत्कार यावेळी करण्यात आला.
12.00 ते सायं. 4.00 पर्यंत मोफत दंत तपासणी शिबीर चे नियोजन करण्यात आले होते. तसेच सायं. 5.00 वा. भव्य गावातून शोभायात्रा मिरवणुक काढण्यात आली आहे.
यावेळी मुख्याधिकारी , चेतनकुमार माळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, संजय बोंबले. गोपनीय पोलीस, सचिन पाटील. माजी नगराध्यक्ष चंद्रकांत गवंडी , दिनकर भोपळे ,माझी उपनगराध्यक्ष, रवींद्र धडेल, चेतन भोसले, सामाजिक कार्यकर्ते ,मारुती माने, धनंजय बच्चे , राजू आगा, शहाबाज मुजावर, तय्यब मुजावर, दिलीप दळवी, तसेच महिला सुषमा गवंडी , रूपाली कांबळे, रोहिणी कांबळे, सुषमा पन्हाळकर, कांचन कासे, धनश्री जंनजाळे, इत्यादी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तर सूत्रसंचालन सचिन गवंडी यांनी केले, जयंतीचे नियोजन नंदकुमार कांबळे ,सचिन कासे, प्रताप कासे ,सुशांत पन्हाळकर, साहिल पवार, विशाल कांबळे, सतीश कासे, अनुप गवंडी ,अक्षय सोरटे, अमोल वाडेकर जे.बी.स्पोर्ट्स पन्हाळा चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.