कोल्हापूर शहरात 9 डिसेंबरला पाणीपुरवठा राहणार बंद; 10 डिसेंबर रोजी अपुरा पाणीपुरवठा होणार; पाणी जपून वापरण्याचे आवाहन
schedule06 Dec 24 person by visibility 224 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे बालिंगा सब स्टेशनच्या 33 केव्ही मुख्य वीज वाहिनीचे मासिक देखभाल दुरुस्तीचे कामकाज सोमवार, दि.9 डिसेंबर 2024 रोजी महावितरणामार्फत हाती घेण्यात येणार असल्याने विद्युत पुरवठा बंद रहाणार आहे. त्यामुळे सोमवार, दि.9 डिसेंबर 2024 रोजी होणारा दैनंदिन पाणी पुरवठा बंद राहिल व मंगळवार दि.10 डिसेंबर 2024 रोजी होणार पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल.
यामध्ये ए, बी, वॉर्ड त्यास सलग्नित उपनगरे, ग्रामिण भाग व शहरी अंतर्गत येणा-या लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरुजी वसाहत, राजेसंभाजी, क्रशर चौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतीसिंह नाना पाटीलनगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंभे रोड, शिवाजी पेठ, चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाव्दार रोड, मंगळवार पेठ काही भाग. संपूर्ण सी डी वॉर्ड दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, ब्रम्हपुरी, बुधवार पेठ तालिम, सिद्धार्थनगर, पापाची तिकटी परिसर, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफीस, बिंदु चौक, आझाद चौक परिसर, उमा टॉकीज परिसर, महालक्ष्मी मंदीर परिसर, गुजरी, मिरजकर तिकटी, देवल क्लब व त्यात सलग्नित ग्रामिण भाग व उपनगरे तसेच ई वॉर्ड अंतर्गत खानविलकर पेट्रोल पंप परिसर, शाहुपूरी 5, 6, 7 व 8 वी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक इत्यादी परिसरात पाणी पुरवठा होणार नाही.
तरी या भागातील नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.