जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक मानवी हक्क दिवस साजरा
schedule10 Dec 24 person by visibility 128 categoryराज्य
कोल्हापूर : मानवी हक्काचं उल्लंघन रोखण्यासाठी तसेच माणसाच्या मूलभूत हक्क व अधिकारांविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात 'जागतिक मानवी हक्क दिवस' साजरा करण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी महसूल डॉ.संपत खिलारी म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीला चांगले काम करण्याची संधी समाजात आहे. व्यक्तीच्या हक्काचे उल्लंघन होणार नाही, याची आपण दक्षता घ्यावयाची आहे. समाजातील दारिद्र्य, विषमता, भेदभाव, पिळवणूक, छळ इत्यादी कारणांमुळे नागरी, सामाजिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक बाबींसंदर्भातील मानवी हक्कांचे उल्लंघन होऊ नये. सर्वांना समान संधी सुनिश्चित करण्यासाठी व मानवी मुल्ये जपण्यासाठी सर्वांनी सजग रहावे, असे आवाहनही उपजिल्हाधिकारी महसूल डॉ.संपत खिलारी यांनी केले.
राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व अनेक समाज सुधारकांनी सर्व सामान्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रचंड कष्ट केले त्यांची आठवण व जाणीव सर्वांनी ठेवणे आवश्यक आहे. प्रतिष्ठा, समानता आणि परस्पर आदराच्या तत्वांवर आधारित आहेत. ते संस्कृती, धर्म आणि तत्वज्ञानांमध्ये सामायिक आहेत. अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि समानता राखण्यासाठीही हक्क महत्वाचे आहेत. सर्वमानवांबद्दल सहानुभूती, समजूतदारपणा आणि आदर विकसित करणे, त्यांच्या मतभेदांची पर्वा न करता यामध्ये मोकळेपणाचा आणि विविध दृष्टीकोन ऐकण्यास आणि समजून घेण्यास तयार असणे समाविष्ट आहे. तसेच करार चळवळीच्या स्वातंत्र्यसारख्या अधिकारांशी संबंधित आहे. कायद्यासमोर समानता: निष्पक्ष चाचणीचा अधिकार आणि निर्दोषतेची धारणा, विचार, विवेक आणि धर्मस्वातंत्र्य, मत आणि अभिव्यक्तीस वातंत्र्य, शांततापूर्णसभा, सहवासाचे स्वातंत्र्य, सार्वजनिक घडामोडी आणि निवडणूकामध्ये सहभाग हे मानवाधिकाराचे घटक आहेत.
या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी महसूल डॉ.संपत खिलारी, तहसीलदार (सर्वसाधारण) विजय पवार, तहसिलदार महसूल हणमंत म्हेत्रे, अपर चिटणीस स्वप्निल पवार व अधिकारी - कर्मचारी आदी उपस्थित होते. तसेच उपस्थित जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी - कर्मचारी यांनीही मनोगते व्यक्त केली.