विशेष अधिवेशनात आज जयंत पाटील, विनय कोरे (सावकार), सुनील शेळके, उत्तम जानकर नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली सदस्यपदाची शपथ
schedule09 Dec 24 person by visibility 194 categoryराज्य
मुंबई : विधानसभेच्या विशेष अधिवेशनात दि. ९ डिसेंबर रोजी ४ नवनिर्वाचित सदस्यांना विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास निळकंठ कोळंबकर यांनी सदस्यपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.
शपथ घेतलेल्या सदस्यांमध्ये जयंत राजाराम पाटील, विनय विलासराव कोरे (सावकार), सुनील शंकरराव शेळके, उत्तम शिवदास जानकर यांचा समावेश आहे.
या विशेष अधिवेशनाच्या कालावधीत एकूण २८३ सदस्यांनी सदस्यपदाची शपथ घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सदस्य उपस्थित होते.