SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मुंबईबाहेर गेलेल्या नागरिकांना मुंबईत हक्काचे घर मिळवून देणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; कोकणाच्या विकासासाठी कोकण विकास प्राधिकरणाची स्थापनाडी वाय पाटील विद्यापीठाच्या तीन प्राध्यापकांची ‘एमएएस’कडून यंग असोसिएट व फेलो म्हणून निवडइंडिया आघाडीच्या वतीने उद्या रविवारी बिंदू चौक येथे केंद्रीय गृहमंत्र्यांचा निषेध‘आविष्कार’मध्ये पदव्युत्तर संशोधकांकडून १९१ प्रकल्पांचे सादरीकरण; पदवीस्तरीय आणि पीएचडी संशोधन स्तरीय सादरीकरण स्पर्धेचा गटनिहाय निकालनाम. मुश्रीफ, नाम.आबिटकर यांनी दिली गोकुळचे चेअरमन डोंगळे यांच्या घरी सदिच्छा भेट; डोंगळे कुटुंबियांकडून दोन्ही मंत्र्यांचा सत्कारनूतन मंत्री हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर यांचे विमानतळावर स्वागतकरवीर नगरीमध्ये कॅबिनेट मंत्री मुश्रीफ, आबिटकर यांचे जोरदार स्वागतबीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस'बांधावरची झाडे’ निसर्गाकडे पाहण्याचा सद्भाव निर्माण करणारे: डॉ. नंदकुमार मोरे; डॉ. व्ही.एन. शिंदे यांच्या पुस्तकाचे विद्यापीठात प्रकाशनरोजगार हमी योजनेतील मजुरांच्या खात्यात 2 हजार 856 कोटी रुपये जमा

जाहिरात

 

... निश्चितपणे तुमचा आमदार प्रामाणिक : आमदार ऋतुराज पाटील; साळोखे नगर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राचे उद्घाटन

schedule12 Oct 24 person by visibility 467 categoryसामाजिक

कोल्हापूर : ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रांचे काम पाहून समाधान वाटले. या मतदारसंघांमध्ये सातत्याने काम करत असताना आमदार सतेज पाटील यांनी जी वाट घालून दिली ती वाट अजून प्रशस्त करण्यात माझ्यासारख्या कार्यकर्ता सातत्याने प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांचा आशीर्वाद निश्चितच माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मागे राहील. हीच अपेक्षा व्यक्त करून मी एवढे नक्की सांगतो, मी कुणावर टीका करत नाही पण निश्चितपणे तुमचा आमदार प्रामाणिक आहे. यामुळे तुमची साथ मला लाभेल असा विश्वास ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला.

आमदार ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी पार पडला. यामध्ये साळोखे नगर, तात्यासाहेब मोहिते कॉलनी येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राचे उद्घाटन आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

 या विरंगुळा केंद्रामध्ये वॉकिंग ट्रॅक, चिल्ड्रन पार्क, सीट आऊट्स ओपन थिएटर, ओपन योगा सेंटर, ॲक्टिव्हिटी सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. यासाठी तीन कोटीचा निधी खर्च करण्यात आले आहे.

आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राची उभारणी याचे समाधान माझ्यासारख्या नातवाला आहे. केंद्र उभारण्यासाठी पाठपुरावा धीरज पाटील, विनोद पाटील, पद्मजा पाटील, यांनी केला. आणि यातून ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र उभारले याचे समाधान मला आहे.

ज्येष्ठ नागरिक हे समाजातील एक महत्त्वाचे घटक आहेत. आणि मोठा अनुभव या समाजामध्ये आहे. त्यामुळे कोणतेही संकट आले. त्या संकटावर मात करण्याचं मार्गदर्शन ज्येष्ठाकडून मिळत असते. याचा अनुभव मला माझे आजोबा डॉ. डी. वाय. पाटील यांच्यावर चर्चा करताना येत असतो. असाच अनुभव मतदार संघामध्ये काम करताना येत असतो.

मी कुणावर टीका करण्यामध्ये वेळ घालवत नाही. मी कुणावर कधी वाईट बोलत नाही. आपण आपली रेषा कशी वाढेल हे बघितले पाहिजे. दुसऱ्याची रेष पुसण्यापेक्षा राजकारणामध्ये येत असताना आपण चांगले काम करण्यासाठी आलो आहोत. प्रत्येक घटकाला पुढे घेऊन जाण्यासाठी भूमिका ठेवले पाहिजे. राजकारणामध्ये बऱ्याच गोष्टी येतात प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने बोलत असतो. पण आपण त्यामध्ये अडकून न राहता आपण काम करत राहायचं प्रामाणिक प्रयत्न असेल आपल्या सर्व गोष्टींमध्ये यश मिळत असते. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक गोष्ट शिकलो की कोणती गोष्ट अशक्य नसते शक्य करण्याचा सामर्थ आपल्या मध्ये असले पाहिजे हीच भूमिका घेऊन आपण मतदारसंघांमध्ये सातत्याने काम करतोय.

यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले, विरंगुळा केंद्राची उभारणी चांगल्या पद्धतीने झाली असून या केंद्राची देखभाल करण्याची जबाबदारी या भागातील नागरिकांची आहे. आपल्यासाठी भविष्याच्या पिढीसाठी या गोष्टी जपल्या पाहिजेत येथे विविध उपक्रम राबवून हे केंद्र भविष्यातील सांस्कृतिक केंद्र बनावे असे आवाहन त्यांनी केले.

ऋतुराज पाटील गेल्या पाच वर्षांमध्ये सातत्याने काम करत आहेत. मात्र विरोधक बोलत राहणार पण आमदार ऋतुराज पाटील विरोधकावर बोलत नाही ऋतुराज पाटील प्रत्येक वेळी सांगत असतात की मी माझी रेष मोठी करण्यासाठी काम करत राहतो. त्यास आपली साथ लाभणे आवश्यक आहे.  

सतेज पाटील म्हणाले महाविकास आघाडीची सत्ता आणण्याचे ध्येय आमच्यासारख्या कार्यकर्त्याचे असल्यामुळे राज्यामध्ये प्रचारासाठी फिरावे लागणार आहे, लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये आले आहेत मात्र महागाईची फोडणी किचनमध्ये पडली आहे. त्यामुळे त्याविषयी बोलण्याची गरज नाही. मात्र हे राज्य आर्थिक दृष्ट्या सक्षम म्हणून ओळखले जात होते. मात्र राज्यावर नऊ लाख कोटीचे कर्ज आहे, मात्र शासनाकडून योजनांचा पाऊस पडायला लागला आहे. राज्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरांनी केलेल्या विकास कामाचे 40 हजार कोटी रुपये सरकार देणे आहे यासाठी यांनी मोर्चा काढला यांची बिल पेंडिंग आहेत एका बाजूला लोकप्रिय घोषणा चालू आहेत. जनतेसाठी करणे गरजेचे आहे, पण त्यांचे भान सुद्धा या ठिकाणी सरकारला राहिले नाही आपल्याकडे एक म्हण आहे अंथरूण पाहून पाय पसरावे मात्र सत्तेवर आल्यानंतर अंथरून सापडणार नाही अशी परिस्थिती असणार आहे यामुळे ही आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे मोठ्या आव्हान सरकार पुढे असेल.   

मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर नेव्हीवर टीका करण्यात आली मात्र टीका करणे योग्य नसल्याचे आपण सांगितले होते. कारण नेव्ही देशात मोठे योगदान देत आहे. साडेचार वर्षांमध्ये जे गायब होते त्यांचे आता डिजिटल लागले आहेत. आम्ही दोघे काँग्रेसशी एकनिष्ठ आहोत. गेल्या तीस वर्षाच्या राजकारणामध्ये आपण एकनिष्ठ राहिलो असून कधीही पक्ष सोडणार नाही काँग्रेसच्या माध्यमातून आपण काम करत राहू यासाठी आपली साथ आवश्यक आहे.

यावेळीभोला सर, रमेश पाटील, अमर सरनाईक, पत्की, धीरज पाटील, पद्मजा पाटील, शिवाजी राणे, विनोद पाटील, श्रीकांत मोरे, किरण पाटील, ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes