SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गतिमान नेतृत्व, विकासाची दृष्टी आणि सामाजिक बांधिलकीचा संगम : संजय पाटील यड्रावकर जागतिक प्रगतीचा पाया: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनकोल्हापुरात १७ सप्टेंबरपासून लष्कर भरती मेळावालोकशाही दिनी 22 तक्रार अर्ज दाखलबालिंगा-चंबूखडीच्या मेन पाईपलाईनवरील 'महा-गळती'मुळे सलग दोन दिवस कोल्हापूर शहरातील काही भागात पाणी पूर्णपणे होणार गुल कोल्हापूर : शाहू क्लॉथ मार्केटमधील थकबाकी असलेले 60 गाळे सीलमहापालिका कामांना गती देत विभागीय स्तरावर निर्णयक्षमता वाढविण्याचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांचे निर्देशनाविन्यपूर्ण विचारातून उद्योगक्षेत्रातील संधीचा लाभ घ्या : डॉ. राकेश कुमार शर्माशिवाजी विद्यापीठात फुलले ‘कास’...!मुंबई उपनगर जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

जाहिरात

 

गतिमान नेतृत्व, विकासाची दृष्टी आणि सामाजिक बांधिलकीचा संगम : संजय पाटील यड्रावकर

schedule08 Sep 26 person by visibility 141 categoryसामाजिक

एखाद्या शहराचा विकास केवळ सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्यांनी मोजला जात नाही; तो मोजला जातो नागरिकांच्या चेहऱ्यावरच्या समाधानाने, बदललेल्या शहराच्या रूपाने आणि उद्याच्या स्वप्नांना मिळालेल्या नव्या दिशेने. जयसिंगपूरच्या विकासाचा विचार करताना गेल्या दोन-अडीच दशकांपासून सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेले संजय पाटील यड्रावकर यांचे नाव ठळकपणे पुढे येते. विकासाची आस, शहराबद्दलची आत्मीयता आणि काहीतरी नवे घडविण्याची धडपड या त्रिसूत्रीवर त्यांची वाटचाल सुरू आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सार्वजनिक जीवनातील कार्याचा आणि विकासदृष्टीचा घेतलेला हा मागोवा...

जयसिंगपूर शहराच्या सार्वजनिक जीवनात गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून कार्यरत असलेले, कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन, जयसिंगपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आणि राजर्षी शाहू विकास आघाडीचे अध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी शहराच्या विकासाच्या विविध प्रश्नांमध्ये सातत्याने सहभाग घेतला आहे. सहकारमहर्षी स्वर्गीय शामरावआण्णा पाटील यड्रावकर यांचा सामाजिक व सहकार क्षेत्रातील वारसा लाभलेल्या संजय पाटील यड्रावकर यांनी सार्वजनिक जीवनात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.
नगरपरिषदेच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळताना शहरातील मूलभूत सुविधा आणि नागरी विकासकामांना प्राधान्य देण्यात आले.

 छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, मिनी मंत्रालयासारखी दिसणारी नगरपालिकेची भव्य इमारत, जयसिंगपूर शहरातील भुयारी गटार योजना, आंतरराष्ट्रीय दर्जाला शोभेल असे शाहू स्टेडियम, क्रांती चौकातील छत्रपती शाहू महाराज व जयसिंग महाराज यांचे पुतळे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भीमसृष्टीचे सुरू असलेले काम, झोपडपट्टी नियमिती करणाचा प्रश्न मार्गी लावून गरिबांच्या हक्काची घरे त्यांना मिळवून देण्यात यश, रस्ते, पाणीपुरवठा, पथदिवे, स्वच्छता, वृक्षारोपण, परिसर सुशोभीकरण, आणि पेव्हिंग ब्लॉकचे रस्ते अशा विविध कामांच्या माध्यमातून जयसिंगपूरच्या नागरी सुविधांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सिद्धेश्वर यात्री निवास, सहकारमहर्षी स्वर्गीय शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह, नवीन जॅकवेल, पाण्याच्या टाक्या आणि एलईडी पथदिवे यांसारख्या कामांचा समावेश आहे.
संजय पाटील यड्रावकर यांच्या सार्वजनिक कार्यातील महत्त्वाचा पैलू म्हणजे शहराच्या विकासासोबतच ऐतिहासिक आणि सामाजिक वारशाला अधोरेखित करण्याची भूमिका. जयसिंगपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा आणि संग्रहालय उभारण्याची संकल्पना त्यांनी सातत्याने मांडली. या संकल्पनेला पुढे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सहकार्याने गती मिळाली.
पुतळा आणि संग्रहालयासाठी आवश्यक जागेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी यड्रावकर बंधूंनी प्रयत्न केले. सरकारी मूल्य कोट्यवधी रुपयांचे असलेल्या जागेचा प्रश्न मार्गी लागला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीच्या दिशेने त्यामुळे महत्त्वाचे पाऊल पडले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भीमसृष्टी उभारण्यासाठी सुरू असलेली तयारी या सामाजिक समतेचा आणि महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या दृष्टीने या उपक्रमांकडे पाहिले जाते.
सहकारमहर्षी स्वर्गीय शामरावआण्णा पाटील यड्रावकर यांनी बहुजनांच्या विकासासाठी उभे केलेले कार्य आणि सहकार क्षेत्रातील योगदान हा यड्रावकर कुटुंबाचा महत्त्वाचा वारसा मानला जातो. हा वारसा पुढे नेत संजय पाटील यड्रावकर यांनी सहकार आणि सार्वजनिक क्षेत्रात आपला सहभाग कायम ठेवला आहे.

मोठे बंधू आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर व तालुक्यातील विविध विकासकामांमध्ये संजय पाटील यड्रावकर सक्रिय आहेत. दोन्ही बंधूंच्या माध्यमातून जयसिंगपूरसह शिरोळ तालुक्यातील विविध विकासप्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.
आज जयसिंगपूर शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. वाढती लोकसंख्या, पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, स्वच्छता, पर्यावरण आणि आधुनिक नागरी सुविधांची गरज ओळखून शहराची विकासाकडे वाटचाल सुरू आहे.

संजय पाटील यड्रावकर यांच्या सार्वजनिक जीवनाचा प्रवास पाहताना ‘शहरासाठी काहीतरी करण्याची धडपड’ हा समान धागा  त्यांच्या कार्यातून दिसून येतो. राजकीय समीकरणे बदलत राहतात, पदे येतात-जातात; मात्र शहराच्या विकासाचा विषय सातत्याने केंद्रस्थानी राहणे आवश्यक आहे, ही भूमिका त्यांच्या कार्यातून अधोरेखित होते.

जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड शहरासह शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या अनेक कल्पना या उभय बंधूंच्यामध्ये आहेत. विरोधासाठी विरोध म्हणून काही मंडळी आज एकत्र येत आहेत, आता शिरोळच्या जनतेनेच विचार करायला हवा, हे कितपत योग्य आहे. लोकप्रतिनिधी चुकत असेल तर त्यांना जाब विचारण्याचा अधिकार सामान्य जनतेचा नक्कीच आहे, पण शिरोळ तालुक्याची प्रगती रोखण्यामध्ये कोणी आडकाठी करत असेल तर त्यांना सुद्धा रोखणे ही काळाची गरज आहे. कधी नव्हे ते शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी अडीच हजार कोटी रुपयाचा निधी आणि जयसिंगपूर शहरासाठी ३५० कोटी रुपयांचा निधी खेचून आणण्याची शक्ती असणाऱ्या ह्या नेतृत्वाला बळ देण्याची गरज आहे.
वाढदिवस हा केवळ शुभेच्छांचा दिवस नसतो; तो आतापर्यंतच्या प्रवासाकडे मागे वळून पाहण्याचा आणि भविष्यातील वाटचालीचा संकल्प करण्याचाही दिवस असतो. जयसिंगपूरच्या विकासाच्या वाटचालीत आपला सहभाग कायम ठेवणारे संजय पाटील यड्रावकर यांच्या पुढील सार्वजनिक प्रवासातही शहराच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या संकल्पांना बळ मिळावे, सामाजिक सलोखा आणि विकासाची वाट अधिक विस्तृत व्हावी, हीच अपेक्षा. संजय पाटील यड्रावकर यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
- ✍️ संतोष तारळे, हेरवाड

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes