संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' उत्साहात
schedule21 Jun 24 person by visibility 397 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूट अतिग्रे येथे २१ जून ‘आंतरराष्ट्रीय योग दिवसा' निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, डॉ. विराट गिरी यांनी योग दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा देवून कार्यक्रमाची सरुवात करण्यात आली. यांत्रिक अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख, योगशिक्षक प्रा. पी. एम. पाटील यांनी 'आंतरराष्ट्रीय योग दिन २०२४'ची थीम या विषयी माहिती सांगून योग प्रार्थना घेऊन विविध योगासन आणि त्यांचे प्रकार योग करण्याची पद्धती मेडिटेशन चे दैनंदिन जीवनात महत्वाचे स्थान, सूक्ष्म व्यायाम व त्यांचे प्रकार, दीर्घ श्वसन, अनुलोम विलोम, भ्रमारी भसत्रिका इ. प्राणायाम प्रकार आणि ताडासन, त्रिकोणासन, वृक्षासन प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. सूर्यनमस्कार घेऊन आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय योग दिवस मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमास संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सर्व सेलचे समन्वयक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष, संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.