SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात अतिक्रमणांविरोधात महापौरांचा एल्गार...कोल्हापुरात 'केडीएल प्रीमियर लीग' क्रिकेट स्पर्धेचा उद्यापासून थरार; ५०० खेळाडूंचा सहभागइचलकरंजीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा मोठा छापा; ३४ जणांना अटक, पावणे सहा लाखांचा मुद्देमाल जप्तबारामती पोटनिवडणुकीत मोठी घडामोड; लक्ष्मण हाके यांची माघारक्रीडाशक्तीतून शांतता आणि प्रगतीकडे: 'आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस'बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा बिगुल; अँड. आकाश मोरे यांच्या रूपाने नवा चेहरा मैदानातविधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम: पंतप्रधान मोदींचा तृणमूलवर प्रहार, तर राहुल गांधींचे आसाममध्ये सभाबळीराजाला मोठा दिलासा: अस्मानी संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार वाऱ्यावर सोडणार नाही : मुख्यमंत्रीभोंदूगिरीविरुद्ध राज्य सरकारचा कडक पवित्रा; अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून १५०० कोटींच्या घोटाळ्याचा संशयसिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची विकास कामे होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जाहिरात

 

कोल्हापुरात 'केडीएल प्रीमियर लीग' क्रिकेट स्पर्धेचा उद्यापासून थरार; ५०० खेळाडूंचा सहभाग

schedule06 Apr 26 person by visibility 161 categoryक्रीडा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा कार डीलर्स असोसिएशनच्या ६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून 'केडीएल प्रीमियर लीग' या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्यापासून शास्त्रीनगर मैदानावर या स्पर्धेला दिमाखात सुरुवात होणार आहे. या स्पर्धेची सविस्तर माहिती राष्ट्रीय खेळाडू दाऊद पठाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 त्यांनी सांगितले की, कोल्हापूर शहर आणि उपनगरातील वाहन व्यवसाय तसेच जुनी कार खरेदी-विक्री क्षेत्रातील सुमारे ५०० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

 स्पर्धेत एकूण १६ संघ उतरले असून यात अण्णा मोटर्स, गवळी मोटर्स, ओम मोटर्स, साई व्हील्स, आय कार्स, युनिक कार्स, श्री मोटर्स, सोना कार्स, स्वामी मोटर्स, शिवानंद मोटर्स, डी मोटर्स, बाबा मोटर्स, प्रगती मोटर्स, एस एम मोटर्स, कोल्हापूर DSA आणि पांजरपोळ या संघांचा समावेश आहे.
 ७ आणि ८ एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत शास्त्रीनगर मैदानावर हे सामने रंगणार आहेत.

 ९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता महापौर रूपाराणी निकम व उपमहापौर अक्षय जरग यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना गौरवण्यात येईल.
या पत्रकार परिषदेस रणजी खेळाडू राजेश घोरपडे, अध्यक्ष सुधाकर सासणे, अध्यक्ष विक्रम गवळी, उपाध्यक्ष इमरान मलबारी, सचिव इजाज नागरकट्टी, खजिनदार अभिजीत चित्रागार, अध्यक्ष जमीर सय्यद, इचलकरंजी अध्यक्ष शीतल दत्तवाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

वाहन व्यावसायिकांमध्ये खेळाडूवृत्ती वाढावी आणि व्यवसायासोबतच आरोग्य जपले जावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे असोसिएशनतर्फे सांगण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes