SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सन्मान ..... कर्तृत्वाचा !कोल्हापूर जिल्ह्यातील 10 बंधारे पाण्याखालीप्रा. यास्मिन शेख यांचे पुण्यात निधन; मराठीवरील प्रभुत्त्व, निस्सीम प्रेमाचा उत्तुंग आदर्श: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजलीतंत्रज्ञान युगात ‘जीआयएस’चे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक : कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्केमुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून ‘रूग्णांना’ दिलासा; पहिल्याच करारातून ८९.६० लाखांची मदतविद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी प्रिन्सेस पद्माराजे हायस्कूलमध्ये 'इंटरॅक्ट क्लब'चा पदग्रहण सोहळा उत्साहात ​आधुनिक 'कोलकाता' शहराचा पाया कसा रचला गेला? साहेब .... एकच नंबर काम घोडावत विद्यापीठाच्या 31 विद्यार्थ्यांची मलेशियातील विद्यापीठात निवडनागावमध्ये भीषण आगीचा तांडव! स्क्रॅप गोडाऊन जळून खाक; ३५ लाखांचे नुकसान

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्ह्यातील 10 बंधारे पाण्याखाली

schedule24 Aug 26 person by visibility 169 categoryराज्य

 कोल्हापूर  : जिल्ह्यातील राधानगरी धरणात सुमारे 8.27 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार सिंचन तथा विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, कासारी नदीवरील- यवलूज व भोगावती नदीवरील- सरकारी कोगे व खडक कोगे असे एकूण 10 बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा (कंसात एकूण टक्केवारी )- राधानगरी 8.27 (99 टक्के), तुळशी 3.46 (100 टक्के), वारणा 33.67 (98 टक्के), दूधगंगा 25.20 (99 टक्के), कासारी 2.66 (96 टक्के), कडवी 2.52 (100 टक्के), कुंभी 2.63 (97 टक्के), पाटगाव 3.58 (96 टक्के), चिकोत्रा 1.29 (85 टक्के), चित्री 1.89 (100 टक्के), जंगमहट्टी 1.22 (100 टक्के), घटप्रभा 1.54 (99 टक्के), जांबरे 0.82 (100 टक्के), आंबेआहोळ 1.24 (100 टक्के), सर्फनाला 0.67 (100 टक्के), धामणी 1.29 (100 टक्के), कोदे ल.पा. 0.21 (100 टक्के) टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 19.9, सुर्वे 19.8, रुई 47.5, इचलकरंजी 45.11, तेरवाड 41,  शिरोळ 32, नृसिंहवाडी 27.3 फूट इतकी पाणीपातळी 

 ◼️जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 5.43 मिमी पावसाची नोंद

कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 21.5 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - हातकणंगले- 2.2 मिमी, शिरोळ - 2.1 मिमी, पन्हाळा- 3.5 मिमी, शाहुवाडी- 3.2 मिमी, राधानगरी- 8.4 मिमी, गगनबावडा- 21.5 मिमी, करवीर- 4.1 मिमी, कागल- 3  मिमी, गडहिंग्लज- 2.5 मिमी, भुदरगड- 4.6 मिमी, आजरा- 5.7 मिमी, चंदगड- 4.4 मिमी असा एकूण 5.43 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes