SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
​"कोल्हापूरच्या हद्दवाढीवर निर्णय घ्या, ...": आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधिमंडळात केली सरकारची कोंडी!राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचे 26 जून रोजी उद्घाटनशिरोळ तालुक्यातील पाच ग्रामपंचायत इमारतींसाठी १ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर; आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा पाठपुरावा विद्यार्थीसंख्या वाढीसाठी गुणवत्ता आणि विश्वासार्हता आवश्यक : डॉ. विलास शिंदेकळंबा तलावातील गाळ उपशासाठी शेतकऱ्यांना महापालिकेचे आवाहनबोगस डॉक्टरांचे आता खैर नाही! 'नो युवर डॉक्टर' क्यूआर कोड स्कॅन करा आणि तपासा; हसन मुश्रीफ यांचा इशाराआरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागेशाहू जयंतीदिनी कोल्हापूर जिल्हा परिषदेत रंगणार 'महा रक्तदान शिबिर'; खा. श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते होणार उद्घाटनकोल्हापुरात धक्कादायक घटना: माजी महापौरांच्या १७ वर्षीय नातवाची आत्महत्यास्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये २७ जूनला अभियांत्रिकी प्रवेशाबाबत मार्गदर्शन

जाहिरात

 

संजय घोडावत इन्स्टिट्यूट, उन्हाळी परीक्षा २०२६ मध्ये सर्व विभागांचा उच्चांकित निकाल; २९ विषयाचा निकाल १०० टक्के

schedule23 Jun 26 person by visibility 315 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : संजय घोडावत इन्स्टिट्यूट, आतिग्रे येथे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ अंतर्गत पॉलिटेक्निकच्या  उन्हाळी परीक्षा २०२६ मध्ये इन्स्टिट्यूट चा शैक्षणिक गुणवत्तेचा उच्चांकित निकाल लागला आहे.  इन्स्टिट्यूट च्या पॉलिटेक्निक विभागाचा  एकूण २९ विषयांचा निकाल १००% लागला असून, हे यश सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि शैक्षणिक व्यवस्थापनाच्या सामूहिक प्रयत्नांचे प्रतीक आहे.

या परीक्षेमध्ये सर्व विभागांमधून मिळून एकूण ३८ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा अधिक गुण मिळवले. विशेष म्हणजे ५ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १००  गुण इंजिनीरिंग मेकॅनिकस विषयामध्ये मिळवले, ४३४ विद्यार्थ्यांना फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन मार्क्स मिळाले, ३३२  विद्यार्थ्यांना फर्स्ट क्लास  मिळाला आहे.  

तृतीय वर्ष  सर्व विभागातून  गुणवान विद्यार्थी  पाटील मनाली राजेंद्र ९७.२९%,  नेवागे श्रावणी मधुकर ९७.२४ %,  खोराटे ऐश्वर्या सूर्यकांत ९५.७६%, 

द्वितीय वर्ष    यादव कल्याणी सतीश ९३.७६%,   वड्ड  अदिती सचिन  ९२.००.,   देसाई अदिती प्रकाश  ९१.८८%. 

प्रथम वर्ष सर्व विभाग:  घुले संजना श्यामकुमार ९४.११%,    वड्ड आदित्य सचिन ९०.११%,   कादरी आरमान रिजवान ९०.००%.  अशी माहिती पॉलिटेक्निक अकॅडमिक डीन प्रा. रवींद्र धोंगडी यांनी दिली आहे.

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मान्यता प्राप्त डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट टर्म कोर्सेस अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अॅडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी या अभ्यासक्रमाच्या उन्हाळी परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सदर अभ्यासक्रमाच्या पाच विषयांचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेसह यश मिळविले आहे. या परीक्षेत प्रदीप देसाई यांनी ८०.१८ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक, चैत्रेश जाधव यांनी ८०.०० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक, तर समीक्षा जोशी आणि सुरज चिखले यांनी प्रत्येकी ७९.५५ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे अशी माहिती विभाग प्रमुख प्रा. अजय कोंगे यांनी दिली.   

संचालक, डॉ. विराट  गिरी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले. या सोबतच यापुढेही उच्चांकी निकालाची परंपरा कायम राहील अशी आशा व्यक्त करून या यशाचे सर्व श्रेय विद्यार्थी, सर्व मार्गदर्शक शिक्षक आणि सर्व विभाग प्रमुख यांना देऊन सर्वांचे मनापासून कौतुक केले. संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त, विनायक भोसले यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या यशाबद्दल सर्वच स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes