SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कळंबा तलावातील गाळ उपशासाठी शेतकऱ्यांना महापालिकेचे आवाहनबोगस डॉक्टरांचे आता खैर नाही! 'नो युवर डॉक्टर' क्यूआर कोड स्कॅन करा आणि तपासा; हसन मुश्रीफ यांचा इशाराआरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागेशाहू जयंतीदिनी कोल्हापूर जिल्हा परिषदेत रंगणार 'महा रक्तदान शिबिर'; खा. श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते होणार उद्घाटनकोल्हापुरात धक्कादायक घटना: माजी महापौरांच्या १७ वर्षीय नातवाची आत्महत्यास्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये २७ जूनला अभियांत्रिकी प्रवेशाबाबत मार्गदर्शनक्रांतीची पहिली ठिणगी: हुतात्मा दामोदर हरी चाफेकरसंजय घोडावत इन्स्टिट्यूट, उन्हाळी परीक्षा २०२६ मध्ये सर्व विभागांचा उच्चांकित निकाल; २९ विषयाचा निकाल १०० टक्केविश्वप्रभा नागरी पतसंस्थेतील ८ कोटींच्या अपहाराची चौकशी करा; ठेवीदारांचा आक्रमक पवित्राकोल्हापूर : उपसा बंदीला २६ जूनपर्यंत पुन्हा शिथिलता

जाहिरात

 

शाहू जयंतीदिनी कोल्हापूर जिल्हा परिषदेत रंगणार 'महा रक्तदान शिबिर'; खा. श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते होणार उद्घाटन

schedule24 Jun 26 person by visibility 98 categoryसामाजिक

कोल्हापूर : सामाजिक क्रांतीचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून, कोल्हापूर जिल्हा परिषदेत भव्य 'महा रक्तदान शिबिरा'चे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक शिबिराचे उद्घाटन खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते होणार आहे.

कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील (CPR) ब्लड बँकेत सध्या रक्ताचा प्रचंड तुटवडा  आहे. गरीब रुग्णांच्या उपचारातील अडथळे दूर करण्यासाठी 'महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी सेवा समिती'ने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले असून, २०० बाटल्या रक्त संकलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या मोहिमेमध्ये जिल्हा परिषदेतील कर्मचारी संघटना, लोकप्रतिनिधी, पुरोगामी शिक्षक संघटना, प्रशासकीय अधिकारी, विविध महाविद्यालये, जागर फाऊंडेशन, महसूल, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग आणि महानगरपालिका प्रशासन तसेच इतर अनेक सामाजिक संघटनांनी सक्रीय सहभाग नोंदवला आहे.
समितीचे राज्याध्यक्ष सुबराव रामचंद्र पवार, राज्यकोषाध्यक्ष सुनील बी. जाधव आणि राज्य सरचिटणीस शहाजी एकशिंगे यांनी नागरिकांना, तरुण कार्यकर्त्यांना आणि शासकीय कर्मचाऱ्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. हे रक्त CPR मधील गरजू व गरीब रुग्णांना मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes