घरफाळा थकबाकीदारांच्या 2 व्यावसायिक आस्थापना सील
schedule21 Oct 26 person by visibility 98 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्रं.3 राजारामपूरी घरफाळा विभाग आणि उपद्रव शोध पथकाच्यावतीने घरफाळ्याची थकबाकी न भरलेल्या मिळकतधारकांविरोधात कारवाई तीव्र करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत आज विभागीय कार्यालय क्रमांक 3 राजारामपूरी अंतर्गत शाहू मिल चौक येथील सहारा टायर्स याची थकीत रक्कम 7 लाख 23 हजार 79 रुपये व उद्यमनगरमधील नारायण राव यांचा फॅब्रीकेशन व्यवसायाचे शेडची थकीत रक्कम 14 लाख 63 हजार 456 रुपये असलेने या दोन थकबाकीदारांच्या व्यावसायिक मिळकती आज सील करण्यात आल्या.
ही कारवाई महानगरपालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड आणि उपआयुक्त परितोष कंकाळ व सहा.आयुक्त डॉ.विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये करअधीक्षक दत्तप्रसाद माजगावकर, वरिष्ठ लिपीक अच्युत अडुरकर व इतर सर्व लिपिक तसेच उपद्रव शोध पथकातील जवान सहभागी झाले होते.
◼️थकबाकीदारांवरील कारवाई यापुढेही सुरू राहणार
महानगरपालिकेची घरफाळा थकबाकी वसूल करण्यासाठी सर्व विभागीय कार्यालयनिहाय दैनंदिन स्वरूपात कारवाई करण्यात येणार आहे. थकीत घरफाळा न भरणाऱ्या व्यावसायिक मिळकती सील करण्याबरोबरच रहिवासी मिळकतींवर महानगरपालिकेचा बोजा नोंदविण्याची कारवाईही करण्यात येणार आहे. त्यामुळे थकबाकीदार मिळकतधारकांनी आपली थकीत रक्कम तातडीने भरून कारवाई टाळावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.