संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचा उद्घघाटन सोहळा उत्साहात
schedule04 Jul 24 person by visibility 455 categoryक्रीडा
अतिग्रे : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये सन 2024 च्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचा दि 4 जुलै रोजी सकाळी 9.00 वा. उद्घघाटन समारंभ यशस्वी पार पडला. यावर्षी पहिल्यांदाच संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विविध शाखांमधील विद्यार्थ्यांसाठी या क्रीडास्पर्धेचे आयोजन केले आहे.
या स्पर्धेमध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल मुळशी, पुणे, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल बेळगाव, संजय घोडावत केंब्रीज स्कूल, संजय घोडावत सीबीएससी बोर्डिंग स्कूल, संजय घोडावत सीबीएससी डे बोर्डिंग स्कूल, आय बी डी पी, सीबीएससी ज्युनिअर कॉलेज, मधील खेळाडू सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग खेळाडू स्नेहांकिता वरुटे उपस्थित होत्या. त्याचबरोबर चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती, यांच्या उपस्थित पार उद्घाटन सोहळा पार पडला.
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विविध शाखांमधील 600 पेक्षा अधिक खेळाडू स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत.11, 14, 17 व 19 या वयोगटातील विविध ॲथलेटिक, जलतरण, फुटबॉल, तायक्वांदो, बुद्धिबळ, बॅडमिंटन, एअर रायफल शूटिंग अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस या स्पर्धा संजय घोडावत स्कूलच्या, अतिग्रे येथील मैदानावर चालणार आहेत.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना स्नेहांकिता वरुटे म्हणाल्या, स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले आहे. सहभागी खेळाडूंनी आपल्यामधील कौशल्य व मेहनत यांच्या जोरावर यश प्राप्त करावे. खेळाकडे एक करियर म्हणून पहावे. खेळातून आपल्या देशाचे नाव उज्वल करण्याचा प्रयत्न करावा.
यावेळी मनोगत व्यक्त करताना संजय घोडावत म्हणाले, नुकत्याच झालेल्या टी-20 मध्ये भारताने नावलौकिक प्राप्त केले. तसेच नावलौकिक आपल्या संकुलातील या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर व ऑलम्पिकमध्ये प्राप्त करावे. त्यासाठी सर्व ती मदत करण्यासाठी मी सदैव तयार आहे. विद्यार्थ्यांनी कितीही मोठे झाले तरी नेहमी नम्र असणे महत्त्वाचे आहे. असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संजय घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यानी प्रमुख अतिथींचे औक्षण करून स्वागत केले. तसेच स्वागतगीत व नृत्य सादर केले. त्यानंतर सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी प्रमुख अतिथींना मानवंदना देत संचलन केले.
त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योतीचे पूजन करण्यात आले. अतिथींनी क्रीडाध्वज फडकवून विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ देऊन खेळाची सुरुवात करण्यात आली. यावेळी बोर्डिंग स्कुलचे प्राचार्य डॉ. एच एम नवीन, बेळगाव स्कूलचे प्राचार्य श्री सॅमसन, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री नितेश नाडे, पुणे स्कुलचे प्राचार्य पौरुष्प करकरिया, डे बोर्डिंग स्कूलचे प्राचार्य श्री अस्कर अली व सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.