महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन व ऑलिंपिकवीर कै.खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठात (बॉडी-मास इंडेक्स) तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद
schedule15 Jan 25 person by visibility 132 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांची जयंती तथा महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन आज शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यापीठात नागरिकांसाठी आयोजित केलेल्या वजन-उंची गुणोत्तर (बॉडी-मास इंडेक्स) तपासणीला उत्तम प्रतिसाद लाभला.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी दहा वाजता मा कुलगुरू प्रा. डॉ. दिगंबरशिर्के सर यांच्या हस्ते ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, खेळाडू यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.
तत्पूर्वी, विद्यापीठाचा क्रीडा अधिविभाग आणि जैव-रसायनशास्त्र अधिविभागातर्फे प्र-कुलगुरू प्रा.डॉ. प्रमोद पाटील सर यांच्या हस्ते सकाळी सात वाजता BMI चाचणी शिबिराचे उद्घाटन झाले याप्रसंगी अधिष्ठाता प्रा.डॉ एम एस देशमुख , प्रा.डॉ. आर जे पवार विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक प्रा डॉ. शरद बनसोडे आणि जीव-रसायनशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. कैलास सोनवणे, उपस्थित होते.
यानंतर विद्यापीठात मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या व्यक्तींसह विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, प्रशासकीय सेवक,खेळाडू व विद्यार्थी यांच्यासाठी वजन उंची गुणोत्तर तपासणी शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये 510 हून अधिक व्यक्तींची तपासणी करण्यात आली सदर शिबिराचे आयोजन प्रशिक्षक सुचय खोपडे, किरण पाटील, सुभाष पवार, डॉ. नवनाथ कुंभार, प्रा. रूपाली कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा व शारीरिक शिक्षण अधिविभाग व विभाग, एम. एस्सी वैद्यकीय माहिती व्यवस्थापन , जीव रसायनशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी केले .