३७ वा राजर्षी शाहू पुरस्कार २०२३: डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग यांना संयुक्तपणे जाहीर; २६ जून रोजी पुरस्कार वितरण होणार
schedule14 Jun 23 person by visibility 1938 categoryसामाजिक
कोल्हापूर : सन २०२३ चा राजर्षी शाहू पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रांतील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर समाजसेवक डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांना दिनांक २६ जून, २०२३ रोजी संयुक्त प्रदान करणेत येणार आहे. हा पुरस्कार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली दिला जाणार आहे.
या वर्षीचे पुरस्कार विजेते डॉ. अभय बंग यांचे बालपण महात्मा गांधीच्या सेवाग्राम आश्रमात गेले असून महात्मा गांधीचे विचार, वैज्ञानिक संशोधनाची कार्यपध्दती, ग्रामीण व आदिवासी भागातील लोकांची वैद्यकीय सेवा, आणि राष्ट्रीय ते जागतिक आरोग्य नीतीवर प्रभाव अशा विविध पैलूसोबतच डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग हे त्यांच्या मराठी पुस्तकांसाठी आणि बालमृत्यू व दारूची समस्या यावरील सातत्याने कामासाठी महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. 'सेवाग्राम ते शोधग्राम' हे त्यांच्या जीवनाच्या प्रवासाचे त्यांनी केलेले वर्णन आहे.
डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांनी वैद्यकीय क्षेत्रांतील समाजसेवा, दारूबंदी चळवळ, आदिवासी समाजासाठी कार्य केलेले आहे. डॉ. बंग दाम्पत्य हे एम डी. (नागपूर), एम. पी. एच. (जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ, यू.एस.) तसेच वैद्यकीय शिक्षणाच्या दरम्यान विद्यापीठात व भारतात प्रथम स्थान, चार सुवर्णपदके तसेच मानद D.Sc. D. Lit. झालेले आहेत. 'द लॅन्सेट' सारख्या वैश्विक प्रतिष्ठेच्या संशोधन नियतकालिकांसहित विविध प्रतिष्ठित नियतकालिकांत ग्रामीण आरोग्य, बाल आरोग्य, स्त्रियांचे आरोग्य अशा विषयांवर ३८ शोधनिबंध प्रसिध्द केले आहेत. तसेच 'माझा साक्षात्कारी हृदयरोग', 'कोवळी पानगळ', 'सेवाग्राम ते शोधग्राम', डॉ. राणी बंग यांची 'गोईण', 'कानोसा' इत्यादी ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत.
डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर अनेक पुरस्कार देऊन सन्मानीत केले गेले आहे. त्यांच्या कार्याबद्दल भारत सरकारचा 'पदमश्री पुरस्कार' (२०१८), व अन्य दोन राष्ट्रीय पुरस्कार (२००८) साली प्राप्त झाले असून महाराष्ट्र शासनाचा 'महाराष्ट्र भूषण' (२००५), 'भारतीय आरोग्य विज्ञान संशोधन संस्थेचा (ICMR), 'गोईण' पुस्तकाला साहित्य पुरस्कार, व आदिवासीचे सामाजिक आरोग्य या विषयातील संशोधनाकरिता 'आदिवासी सेवक', व मुक्तीपद व्यसनमुक्ती केंद्राला महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच अन्य १६ पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेले आहे. याचबरोबर भारत सरकारच्या 'आदिवासींचे आरोग्य' यावरील तज्ञ समितीचे अध्यक्ष, महाराष्ट्र शासनाच्या संतुलित विकास अच्चुस्तरीय (डॉ. केळकर) समितीचे सदस्य, बालमृत्यू व कुपोषण विषयक समितीचे अध्यक्षपद व अमेरिकेतील राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या वैद्यकीय समितीचे सदस्य व अन्य काही संस्थेमध्ये अध्यक्ष व सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

अशा या थोर वैद्यकीय क्षेत्रांत कार्य केलेल्या डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांना हा पुरस्कार घोषीत करण्यास राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टला आनंद होत आहे. अशा प्रकारचे महनीय कार्य केलेल्या डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांना हा संयुक्त पुरस्कार देण्याचा निर्णय ट्रस्टच्या विश्वस्तांच्या बैठकीमध्ये एकमताने घेण्यात आला आहे. राजर्षी शाहू पुरस्काराचे स्वरूप हे रक्कम रु. एक लाख, स्मृतीचिन्ह व मानपत्र असे असून हा पुरस्कार राजर्षी शाहू जयंतीदिनी म्हणजे सोमवार दि. २६ जून २०२३ रोजी सायं. ०६.०० वाजता मुख्य सभागृह, शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
दिनांक २१ जून २०२३ ते २५ जून २०२३ या कालावधीत राजर्षी शाहू जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन सायं. ०६.०० वाजता केलेले आहे. यावरील व्याख्यानमालेनंतर दिनांक २६ जून २०२३ रोजी सायंकाळी ०६.०० वाजता राजर्षी शाहू जयंती व राजर्षी शाहू पुरस्कार -२०२३ वितरण समारंभ होणार आहे.