SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्ह्यातील 51 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 4.89 टीएमसी पाणीसाठाआजचा फॅशन डे: स्वतःच्या शैलीचा नवा आविष्कारमहाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती​‘त्या’ घटनेने पेठवडगाव सुन्न: भरदिवसा, भररस्त्यात पत्नीचा बळी; आरोपी पतीच्या शोधात पोलीसपंचगंगा घाट व शाहू मिल परिसराची महापौर रुपाराणी निकम यांच्याकडून पाहणी; आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देशएसआयआर मोहिमेला मुदतवाढ द्या; सतेज पाटील यांची मागणी शैक्षणिक गुणवत्तेत कोरे डिप्लोमाची पुन्हा एकदा बाजी; महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून 'अतिशय उत्कृष्ट' मानांकनपंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज सुरूकोल्हापूर मंडळातील नोंदणीकृत खाजगी रुग्णालयांची विशेष तपासणी; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईकोल्हापुरात मोठी कारवाई: १५ पोलीस ठाण्यांमधील ५१५ किलोहून अधिक अमली पदार्थ नष्ट!

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्ह्यातील 51 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 4.89 टीएमसी पाणीसाठा

schedule09 Jul 26 person by visibility 110 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 4.89 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून  पाण्याचा विसर्ग निरंक आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- सरकारी कोगे, हळदी, खडक कोगे व राशिवडे,  तुळशी नदीवरील- कसबा बीड व आरे,  कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे आळवे, पुनाळ तिरपण, बाजार भोगांव, वालोली व पेंडाखळे, कुंभी नदीवरील- कळे व सांगरुळ, धामणी नदीवरील- सुळे,  वारणा नदीवरील- कोडोली, मांगलेसावर्डे, खोची, शिगाव, चावरे व दानोळी, कडवी नदीवरील- सवतेसावर्डे, सरुडपाटणे व शिरगाव, दूधगंगा नदीवरील- सिध्दनेर्ली, दत्तवाड, सुळकूड व बाचणी, वेंदगंगा नदीवरील- कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापुर व सुरुपली, घटप्रभा नदीवरील- हिंडगाव, पिळणी, भोगोली, अडकूर, तारेवाडी व कानडेवाडी, ताम्रपर्णी नदीवरील -चंदगड, कोतेवाडी, हल्लारवाडी व कोवाड असे एकूण 51 बंधारे पाण्याखाली आहे. 

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 4.89 टीएमसी, तुळशी 1.90 टीएमसी, वारणा 19.52 टीएमसी, दूधगंगा 7.13 टीएमसी, कासारी 1.45 टीएमसी, कडवी 1.34 टीएमसी, कुंभी 1.34 टीएमसी, पाटगाव 1.72 टीएमसी, चिकोत्रा 0.59 टीएमसी, चित्री 0.98 टीएमसी, जंगमहट्टी 0.77 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, आंबेआहोळ 0.90 टीएमसी, सर्फनाला 0.58 टीएमसी, धामणी 1.29 व कोदे ल.पा. 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 37.1 फूट, सुर्वे 35.7 फूट, रुई 65.9 फूट, इचलकरंजी 61.8 फूट, तेरवाड 55.9 फूट, शिरोळ 51 फूट, नृसिंहवाडी 49 फूट, राजापूर 38.10 फूट तर नजीकच्या सांगली  26.9 फूट व अंकली 29.10 फूट अशी आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes