बेकायदेशीर विनापरवाना देशी दारू वाहतूक करणाऱ्या एक जण ताब्यात 6,02,400/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
schedule03 Nov 24 person by visibility 267 categoryगुन्हे
कोल्हापूर : बेकायदेशीर विनापरवाना देशी दारू वाहतूक करणाऱ्या एकास ताब्यात घेवुन त्याचे कब्जातुन 6,02,400/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात आली.
दि. 03 नोव्हेंबर रोजी पहाटे नवे पारगांव, ता. हातकणंगले गावचे हद्दीतील वाठार ते वारणा जाणारे रोडवरून ओमनी कार मधुन बेकायदेशीर विनापरवाना दारूची वाहतुक होणार असलेबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अमंलदार शिवानंद मठपती व संजय कुंभार यांना माहिती मिळाली.
या माहितीचे अनुषंगाने पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर कडील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांचे पथकाने आज दिनांक 03 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास ग्रामिण रुग्णालय, नवे पारगांव, ता. हातकणंगले समोरील वाठार ते वारणा जाणारे रोडवर सापळा लावून बेकायदेशीर, विनापरवाना देशी दारूची वाहतुक करत करणाऱ्या महेश बाळासो पाटील वय 36, रा. जुने पारगांव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर यांस सकाळी 06.20 वा. चे सुमारास ताब्यात घेवुन त्याचे कब्जातील मारूती सुझुकी ओमनी कार नं. MH-09-EU-5707 मधील कागदी पुठ्याचे बॉक्समधील देशी दारू जी.एम. डॉक्टर, देशी दारू पहिली धार संत्र, देशी दारू टँगो पंच असा 1,34,400/- रुपये किंमतीची देशी दारू व 4,68,000/-रूपये किंमतीची गुन्ह्यात वापरलेली मारूती सुझुकी ओमनी कार असा एकुण 6,02,400/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरचा मुद्देमाल व नमुद आरोपी यांस पुढील कायदेशीर कारवाई कामी वडगांव पोलीस ठाणेत जमा केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार शिवानंद मठपती, संजय कुंभार, वसंत पिंगळे, संजय हुंबे, रूपेश माने कृष्णात पिंगळे, अमित मर्दाने, राजेंद्र वरंडेकर यानी केली आहे.