SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
‘गोकुळ’ परिवारातील सदस्यांची जि.प. निवड अभिमानास्पद : नविद मुश्रीफ; गोकुळ मार्फत मान्यवरांचा सत्कारकोल्हापुरात 'कव्वाली महोत्सवा'चे २१ फेब्रुवारीपासून आयोजनशिवाजी विद्यापीठात उद्या ‘अकौंन्टन्सी म्युझियम ऑफ इंडिया’चे उद्घाटनशिवाजी विद्यापीठात रविवारी नोकरी महामेळाव्याचे आयोजन; ८००० जागांच्या भरतीसाठी मुलाखती होणार'संशोधन प्रकल्प निधी कसा मिळवावा' या विषयावर शिवाजी वि‌द्यापीठामध्ये उद्या एकदिवसीय कार्यशाळा‘गोकुळ’ कडून म्हैस दूध खरेदी दरात १ रुपये व गाय दूध खरेदी दरात २ रूपये वाढ : चेअरमन नविद मुश्रीफजागतिक सामाजिक न्याय दिन: समता आणि सन्मानाचा जागरप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात डी वाय पाटील विद्यापीठात शिवजयंती उत्साहात साजरी; मेडिकल कॉलेज स्टूडेंट कौन्सिल कडून आयोजन, पालखी, लेझीमच्या तालावर वातावरण शिवमयडॉ. संजय डी पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून सामाजिक उपक्रम

जाहिरात

 

कोल्हापुरात 'कव्वाली महोत्सवा'चे २१ फेब्रुवारीपासून आयोजन

schedule20 Feb 26 person by visibility 156 categoryराज्य

कोल्हापूर : राज्यातील सांस्कृतिक परंपरेला उजाळा देण्यासाठी आणि कव्वाली या कलाप्रकाराला व्यासपिठ मिळवून देण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत कोल्हापुरात भव्य कव्वाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २१ ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सायंकाळी सात वाजता राजारामपुरी येथील ताराराणी विद्यापीठाच्या वि. टी. पाटील स्मृती भवन येथे हा महोत्सव पार पडणार आहे.

नामवंत कव्वाल आपली कला सादर करणार आहेत. सुफी संगीत आणि कव्वालीच्या माध्यमातून भक्ती आणि प्रेमाचा संदेश देणारे दिग्गज कलाकार या निमित्ताने एकाच मंचावर येणार आहेत.

राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सावाचे आयोजन करण्यात आले आहे. लुप्त होत चाललेल्या लोककलांना आणि संगीत प्रकारांना उभारी देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग सातत्याने प्रयत्नशील असून, या महोत्सवाच्या माध्यमातून कोल्हापूरच्या कलाप्रेमींना एक आगळीवेगळी पर्वणी मिळणार आहे.

दिनांक २१ फेब्रुवारी रोजी हाजी सुलतान नाजा व रोहित अली यांचा कव्वालीचा कार्यक्रम होणार असून दिनांक २२ फेब्रुवारी रोजी राहुल शिंदे तर दिनांक २३ फेब्रुवारी रोजी हैदर नाजा , पुणे यांचा कवाली चा कार्यक्रम सादर होणार आहे. कव्वाली ही केवळ गायकी नसून ती एक आध्यात्मिक अनुभूती आहे. कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महोत्सवाचा आणि सुरांच्या या अनोख्या प्रवासाचा आनंद घ्यावा," असे आवाहन संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes